
शंभुराजे शाहुराव फरतडे यांना “उत्कृष्ट पत्रकार” पुरस्कार मिळाल्याबद्दल व हिवरे जिल्हापरिषद शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल
राष्ट्रवादी व शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या,
यावेळी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, उपतालुकाप्रमुख बंडु शिंदे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सदस्य महेश काळे पाटील, राष्ट्रवादी सामाजिक न्याय चे जिल्हासरचिटणीस महेश मोरे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.


या वेळेस सत्काराला उत्तर देताना फरतडे म्हणाले की आयुष्यात समाजिक कार्य करत असताना मिळालेली पदं व पुरस्कार हे आपली जबाबदारी वाढवत असतात त्या पदांना व पुरस्कारांचा सन्मान ठेवणे आपले कर्तव्य असून भविष्यात पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अधिक अग्रेसर राहुन काम करणार असल्याचे सांगितले.



