पाथुर्डी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी
केम प्रतिनीधी/संजय जाधव


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथुर्डी येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी नंदिनी जाधव हिला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान देण्यात आले व तिच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ. अश्विनीताई संतोष मोटे, शाळा व्यवस्थापन समितीच्या नूतन अध्यक्ष मीनाताई आप्पा मोटे, बचत गटाच्या अध्यक्षा सुमनताई नाळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य संगीता श्रीमंत मोटे, सदस्या अंबिका लक्ष्मण शिंदे, त्याचबरोबर मीराताई बंडगर, ललिता शिंदे, सदस्य मनीषा सुरेश मोटे, गावचे उपसरपंच प्रकाश खरात, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सदाशिव कांतीलाल तोडेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार शीतलकुमार मोटे, ग्रामसेवक महेश काळे, चेअरमन संतोष मोटे, ग्रामपंचायत सदस्य सचिन चांगण, आप्पा मोटे, सुरेश मोटे, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष धनंजय मोटे, सदस्य सदाशिव वाघे, सहशिक्षिका सुरेखा चौरे, कविता कांबळे, अंगणवाडी सेविका सुषमा कोरे, सहशिक्षक डी. पी. चौगुले, आरोग्य सेविका पोतदार सिस्टर, आरोग्य सेवक कावळे आण्णा समुदाय, आरोग्य अधिकारी निलेश कुबेर, केम प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. विशाल जगदाळे आदी उपस्थित होते.
यावेळी मेंदुजवर लसीकरणाचा शुभारंभही करण्यात आला. मा. गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत साहेब यांच्या संकल्पनेतून सायन्स वाॅलचे उद्घाटन उपाध्यक्ष श्री. सदाशिव कांतीलाल तोडेकर यांनी केले. सदस्य तोडेकर यांच्या देणगीतून ही विज्ञान भिंत (सायन्स वॉल) साकारण्यात आलेली आहे.
बालिका दिनाचं औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान अंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदिनी जाधव व मुख्याध्यापक श्री. महेश्वर कांबळे यांच्या हस्ते एका वृक्षाचे रोपण करण्यात आले.
मुलींनी सावित्रीबाईंना त्यांच्या ओव्यातून व गाण्यातून अभिवादन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.



