-->
क्राईमराज्य

Instagram वर स्टोरी ठेवून तरुणाची आत्महत्या; ५ दिवसाच्या अथक प्रयत्नांनंतर सापडला मृतदेह

 

माय मराठी न्युज नेटवर्क

 

तुला माझ्यासारखे हजार मिळतील पण…. अशी स्टोरी इंस्टाग्राम वर ठेवून एका सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणाने औरंगाबाद येथील हर्सूल तलावात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

 

औरंगाबाद येथील हरसुल तलावात गोळी घेत एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्रांना फोन करून आपल्याला धोका मिळाला असल्याचे सांगितलं होते. त्यानंतर तरुणाने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अग्निशामन दलाने गेली पाच दिवस हर्सूल तलावात शोध मोहीम राबविल्यानंतर त्यांना या मुलाचा मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

 

 

कुणाल काकासाहेब देहाडे असे आत्महत्या केलेले १७ वर्षीय मुलाचे नाव असून तो औरंगाबाद मधील रामनगर परिसरातील मुकुंदवाडी येथील रहिवासी आहे. कुणाल याने बारावी पर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण केले होते. तर त्याचे वडील बांधकाम व्यवसायिक असल्याने तो आपल्या वडिलांना कामात मदत करत होता. यावेळी त्यांने आपल्या वडिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी दुचाकीवरून सोडून तेथून दुचाकी घेऊन गेला.

 

यानंतर त्यांने आपल्या मित्र-मैत्रिणींना कॉन्फरन्स कॉल करून संवाद साधला. मला धोका मिळाला असून मी मुकुंदवाडी रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी जात असल्याची माहिती त्यांने आपल्या मित्रांना दिली. त्यामुळे घाबरलेल्या मित्रांनी तात्काळ कुणालचे घर गाठून त्याबाबत चौकशी केली. पण कुणाला घरी नसल्यामुळे त्यांनी मुकुंदवाडी रेल्वे रुळाकडे धाव घेतली. पण तिथेही कुणाल नव्हता. यानंतर कुणालने पुन्हा फोन केला आणि मी मुकुंदवाडी येथे नसून हर्सूल तलावावर आलो आहे अशी माहिती आपल्या मित्रांना दिली.

 

तसेच मी आता आता तलावात उडी घेत असून हा माझा शेवटचा कॉल असेल असे सांगितलं. यानंतर कुणाच्या मित्रांनी तात्काळ हर्सूल तलावाकडे धाव घेतली असता त्याठिकाणी कुणालची दुचाकी आढळून आली. तर त्याची चप्पल पाण्यात तरंगताना दिसून आली. कुणालने तलावात उडी घेतल्याचे कळताच मित्रांनी हर्सूल तलावावरील सुरक्षारक्षक राजेश गवळी यांना घटनेची माहिती दिली. तसेच पोलिसांसह अग्निशामक दलाला ही पाचारण करण्यात आले. हर्सूल तलावात पाच दिवस शोधकार्य केल्यानंतर अखेर कुणालचा मृतदेह आढळून आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी कुणालने ‘आपको हमारे जैसे हजार मिलेंगे, पर उन हजारोमे हम नही मिलेंगे’ अशी इंस्टाग्राम स्टोरी ठेवली होती. कुणालने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. हर्सूल पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close