-->
आरोग्यराज्यविशेष

३ जानेवारी पासून प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण सुरू

 

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

शासनाच्या वतीने १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरणाला ग्रामीण भागात देखील मोठा प्रतिसाद मिळत असून पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील असणाऱ्या शाळांमधील १८ वर्षे पेक्षा कमी वयाचे विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू असून पालक देखील मुलांना लस मिळावी. यासाठी आग्रही असल्याची माहिती पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा इनामदार यांनी दिली.

 

 

 

शासनाच्या वतीने ०३ जानेवारी पासून प्रत्यक्ष लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू असून राधाकृष्ण विद्यालयातील तब्बल १०० च्या आसपास मुलांचे लसीकरण एकाच दिवशी करण्यात आले. यासाठी आरोग्य केंद्रातील डॉक्टर, आरोग्यसेवक, सिस्टर वेळोवेळी परिसरातील शाळांमध्ये फिरून मुलांना व पालकांना लसीसे महत्व पटवून देत आहेत. यासाठी विद्यालयातील शिक्षक देखील शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला लस मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे.

 

 

वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे, डॉ. प्रियांका सातव – कोलते, डॉ. तन्मय शिंदे, आरोग्य सहाय्यक आण्णा कोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यीका विमल गव्हाणे, आशा गायकवाड, अरुण पोतदार, आरोग्य सेविका प्रमिला सोनवणे, कोमल आचार्य, परमेश्वर दगडखैर, सोपान झुरुंगे, आशिष कोतवाल, महेश झिरपे, अभिषेक कुंभार, नितीन गवळी, आशा सेविका शामल भोसले, वर्षा वाळके, गौतमी कांबळे, आरती आचार्य आदी जनजागृती व लसीकरण करत आहेत. तर राधाकृष्ण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कल्याणी कुलकर्णी, श्रुती रोकडे, गायकवाड यांनी मुलांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close