-->
आरोग्यराज्यसामाजिक

भावडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

शिवसेनेचे कट्टर समर्थक, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच भावडीचे माजी सरपंच नामदेवराव सुदामराव तांबे यांच्या स्मरणार्थ भावडी, तालुका हवेली येथे जिल्हा खणिज प्रतिष्ठाण, पुणे सदस्य सागर नामदेवराव तांबेग्रामपंचायत भावडी यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासाठी एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, महमंदवाडी हडपसर यांची पूर्ण टीम यावेळी उपस्थित होती.

 

 

या मोफत नेत्र तपासणी शिबीरात १२० नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये १० रुग्णाची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तर ५० रुग्णांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले.

 

 

यावेळी भावडी च्या सरपंच आशाताई नामदेवराव तांबे, उपसरपंच, रामदास ढगे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ तांबे, पुनम कदम, दत्तोबा बोरकर, बीरा श्रीराम, सुधीर कर्दळे, ग्रामसेवक बापूसाहेब गव्हाणे व भावडी गावचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. आलेल्या रुग्णाची देसाई नेत्र हॉस्पिटलचे डॉ. अविनाश आडके, वाघमारे साहेब, नितीन वाघमारे, महावीर सोनवणे आदींनी तपासणी केली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close