-->
आरोग्यकरमाळा

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात होणार गुरुवारपासून अस्थिव्यंग दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

गतवर्षी २० फेब्रुवारी २०२० रोजी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आमदार संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, तहसीलदार समीर माने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे यांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालयात सीझर विभाग सुरू
करणे व दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था करणे या विषयावरती चर्चा झाली होती. त्यावेळी आरोग्य विभागाचे उपसंचालक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून आमदार शिंदे यांनी चर्चा करून संबंधित विषय तात्काळ मार्गी लावण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळी दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी रिक्त पदे तात्काळ भरून त्यांना प्रमाणपत्र मिळण्याची व्यवस्था करा अशा सूचना बैठकीदरम्यान आ. संजयमामा शिंदे यांनी दिलेल्या होत्या. त्याची फलश्रुती म्हणजे १८ मार्च २०२१ पासून करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगांना जुने ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र फेर तपासणी करून नवीन प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली होती.

 

आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून गुरुवार दिनांक २३ डिसेंबर २०२१ पासून अस्थिव्यंग (हाडाचे) दिव्यांग रुग्णांची तपासणी करून त्यांना नवीन प्रमाणपत्र देण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे दिव्यांगांचे सोलापूर ला जाण्याचे हेलपाटे वाचणार आहेत. या सुविधेमुळे दिव्यांग नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अस्थिव्यंग (हाडांचे) प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी डॉ. महेश भोसले (अस्थिरोग तज्ञ) डॉ. अमोल डुकरे (वैद्यकीय अधीक्षक) डॉ. राहुल कोळेकर (वैद्यकीय अधिकारी) यांचे बोर्ड नियुक्त केलेले आहेे.

सकाळी १०:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत दिव्यांगांना अस्थिव्यंग प्रमाणपत्रे मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल कोळेकर (९९७०७६७१५५) यांच्याशी संपर्क साधावा.

डॉ.अमोल डुकरे, वैद्यकीय अधीक्षक

गुरुवार दिनांक २३ डिसेंबर पासून करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे अस्थिव्यंग (हाडे) असलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या २५ दिव्यांगांसाठी दर गुरुवारी सकाळी १०:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत प्रमाणपत्रांचे वाटप होणार आहे. तसेच जुन्या ऑनलाइन प्रमाणपत्रांची फेरतपासणी करून नवीन ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच यूडी आयडी कार्ड चे वाटपही होणार आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close