-->
करमाळासामाजिक

करमाळा तालुक्यातील ‘या’ परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याची दहशत कायम; गाडे यांच्या कुत्र्यावर केला हल्ला

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील वडशिवणे पाठोपाठ सातोली परिसरात बिबटया सद्श्य प्राण्याचा वावर आहे. या प्राण्याने गुरूवार दिनांक १६ डिसेंबर रोजी रात्री सातोली शिवारातील संजय कुंडलिक गाडे यांच्या कुत्र्यांवर हल्ला केला आहे. त्याचे ठसे पुन्हा त्याच परिसरात आढळून आले असल्याचे सातोली येथील गावकऱ्यांनी सांगितले आहे.

बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर याच परिसरात असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वडशिवणे, सातोली व दहिवली या परिसरात बिबटयाचा वावर आहे. मागील काही दिवसांपूर्वी वडशिवणे, सातोली परिसरात बिबटयाला जवळपास २० ते ३० ग्रामस्थांनी पाहिले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतीची कामे ठप्प झाली आहेत. सध्या या परिसरात ऊसतोडणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील ऊसतोडणी मजूर ऊघड्यावर कोपी करून राहतात. त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे तर दुसरीकडे वनविभाग मात्र बिबट्या आहे हे मानायला तयार नाही. वनविभागाकडून हा दुसरा एखादा प्राणी आहे असे सांगण्यात येत आहे.

करमाळा तालुका भाजपाचे सरचिटणीस अमरजित सांळुखे यांनी वनविभागाने त्वरीत पिंजरे लावून या बिबट्या सदृश्य प्राण्याचा बंदोबस्त करावा. आज जनावरांवर बिबट्या सदृश्य प्राण्याचे हल्ले होत असताना बंदोबस्त केला जात नाही. मग, काय माणसांवर हल्ले झाल्यावर बंदोबस्त करायचा का..? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close