प्रतिनिधी/कालिदास गावडे


थेऊर येथील आखाडे वस्ती मध्ये भूमीगत गटार लाईन आणि रस्ता नसल्याने प्रशासनाकडे वारंवार लेखी व तोंडी मागणी करून हि सोयी सुविधा उपलब्ध होत नसल्याने आखाडे वस्ती येथील रहिवाशांनी केजी युथ फाउंडेशच्या संपर्क कार्यालया मध्ये येऊन लेखी अर्ज करून भुमीगत गटार लाईन व रस्त्याची मागणी केली.
त्या अनुषंगाने केजी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष खंडूशेठ गावडे यांच्या माध्यमातुन स्वखर्चाने काँक्रिट रस्ता आणि भूमीगत गटार लाईन करण्याचे भूमिपूजन करून त्वरीत काम चालु करण्यात आले. थेऊर ग्रामपंचायत मा. उप-सरपंच नितीन कुंजीर आणि मारूती दादा कांबळे, आनंद वैराट यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन करण्यात आले.
यावेळी केजी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष खंडूशेठ गावडे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सिताराम (दादा) लांडगे, आरपीआय चे हवेली तालुका अध्यक्ष मारुती दादा कांबळे, थेऊर ग्रामपंचायत मा. उप-सरपंच नितीन कुंजीर, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, राष्ट्रवादीकाँग्रेस (सामाजिक न्याय विभाग ) उपाध्यक्ष आनंद वैराट, देवा गावडे, अमर जाधव, सुभाष आखाडे, पत्रकार गणेश धुमाळ, अमोल गायकवाड, खंडु- सोनटक्के तसेच आखाडे वस्ती येथील नागरीक उपस्थित होते.




