
प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


शिरूर हवेली चे आमदार अशोकबापू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केसनंद, ता. हवेली येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, मोहम्मद वाडी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत सुमारे 40 रुग्णाची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाची पुन्हा प्राथमिक तपासणी करण्याचे शिबिर नुकतेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेण्यात आले. यावेळी जुन्या तसेच नवीन रुग्णाची तपासणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शोभा हरगुडे, संतोष हरगुडे, चंद्रकांत सातव, पांडुरंग हरगुडे, हवेली तालुका युवक उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे, भरत चव्हाण, हसन शेख, तुषार वाव्हल, तालुका महिला तालुका उपाध्यक्ष सीता जाधव, कार्यकारिणी सदस्या लीलाबाई हरगुडे, तालुका उपाध्यक्ष मंगेश सातव, मंगल ठाकूर, ऋषिकेश चव्हाण आदी प्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
नेत्र तपासणी बरोबरच रुग्णाची पुनः तपासणी करण्यात येत असल्याने असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला. केसनंद, डोंगरगाव आदी परिसर व वाड्यावस्त्यांवरील नागरिक व युवक यावेळी तपासणी साठी आले होते. आलेल्या रुग्णाची देसाई नेत्र हॉस्पिटलचे डॉ. अविनाश आडके, वाघमारे साहेब, नितीन वाघमारे, महावीर सोनवणे आदींनी तपासणी केली.




