-->
राज्यविशेष

‘या’ शाळेचा स्तुत्य उपक्रम; गुलाब पुष्प व खाऊ देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत

कोरेगाव भीमा येथे विद्यार्थ्यांचे केले अनोखे स्वागत

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कोरेगाव भीमा येथे शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत गुलाब पुष्प व खाऊ देऊन करण्यात आले. ग्रामीण भागात ४ ऑक्टोबरपासून इयत्ता ५ वी ते १२ पर्यंतच्या वर्गांची शाळा सुरु झाली होती. परंतु, इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या वर्गाना परवानगी नव्हती. राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार व जि.प. पुणे च्या आदेशानुसार ६ डिसेंबरपासून १ ली ते ४ थी चे वर्ग सुरु करण्यात आले. दीड वर्षांनंतर शाळेत यायला मिळाल्याने लहानग्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

 

 

यावेळी कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे, माजी सरपंच विजय गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम गव्हाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ राऊत, शिक्षणतज्ञ सुनील भांडवलकर, सदस्य शशिकांत गव्हाणे, नागेश गव्हाणे, सविता तापकिर, दत्तात्रय फडतरे, प्रवीण गव्हाणे, सचिन गव्हाणे, मुकुंद गव्हाणे, सोमनाथ घावटे व मुख्याध्यापिका कुसुम बांदल यांच्या वतीने मुलांना खाऊचे वाटप व गुलाबपुष्प देऊन नवागतांचे स्वागत करण्यात आले.

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व प्रातिनिधीक स्वरुपात विद्यार्थी हजर होते. शिक्षक वनिता कालप, शैलजा टाकळकर, सुरेश सातपुते, इंदूमती शेळके, तुकाराम सातकर, सरोज सातकर, चंद्रकला कुसाळे, रुपाली बावकर, जयमाला मिडगुले, शितल डिके, निवृत्ती सुरडकर, गणेश दाते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close