-->
करमाळाराज्यविशेष

पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या ‘या’ नेत्याची लेक होणार ठाकरे घराण्याची सुन

 

माय मराठी न्युज नेटवर्क

 

पुणे जिल्ह्यातील भाजपचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवार दिनांक ०६ डिसेंबर रोजी मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

 

 

राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी ते आपली कन्या आणि चिरंजीवासह आले होते. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता ही लवकरच विवाह बंधनात अडकणार असून याच लग्नसोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी हर्षवर्धन पाटील हे राज ठाकरे यांच्या घरी आले होते. अंकिता पाटील यांनी फेसबुक वरुन राज ठाकरें यांच्या सोबतच्या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे.

 

 

 

हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या ठाकरे घराण्याच्या सून होणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदूमाधव यांचे सुपूत्र निहार ठाकरे यांच्यासोबत अंकिता पाटील यांचा विवाह होणार आहे. हा विवाह सोहळा येत्या २८ डिसेंबरला मोजक्या लोकांच्या उपस्थित होणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. याच विवाह सोळ्याचे आमंत्रण देण्यासाठी ते आज राज ठाकरे यांच्या घरी आले होते.

अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. तर निहार यांचे एलएलएम पर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी वकिली व्यवसायात जम बसविला आहे. अंकिता यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणि एक वर्ष हार्वर्डमध्ये शिक्षण घेतले आहे. तसेच इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या त्या सदस्या आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या विवाहाची चर्चा रंगली होती. अखेर हर्षवर्धन पाटील यांनी या दोघांच्या विवाहाची अधिकृत माहिती जाहीर केली.

 

बिंदूमाधव यांचे १९९६ मध्ये अपघाती निधन झाले होते. यत्यांच्या निधनाचा बाळासाहेब यांना मोठा धक्का बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू जयदेव हे निहार ठाकरे यांचे सख्ख्ये काका आहेत.तर मनसे प्रमुख राज ठाकरे हे चुलत काका आहेत. या विवाहाच्या निमित्ताने ठाकरे आणि पाटील अशी दोन राजकीय घराणी एकत्र येणार आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close