-->
क्रीडाराजकियसामाजिक

युवा नेते शंभुराजे जगताप यांच्या हस्ते भव्य खुल्या फुल पिच टेनिस बॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

करमाळा तालुक्याचे माजी आमदार मा. श्री. जयवंतरावजी (भाऊ) जगताप व त्यांचे सुपुत्र, युवा नेते शंभूराजे (दादा) जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथे भव्य खुल्या फुल पिच टेनिस बॉल स्पर्धा दिनांक ०५ डिसेंबर २०२१ ते १२ डिसेंबर २०२१ या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या क्रिकेट सामन्याचा लाभ सर्व क्रिकेट प्रेमींनी घ्यावा. असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन आज रविवार दिनांक ०५ डिसेंबर रोजी युवा नेतृत्व शंभूराजे जगताप यांच्या हस्ते नारळ फोडून व फित कापून करण्यात आले. यावेळी बोलताना शंभूराजे जगताप म्हणाले की, कोरोना विषयी नियमांचे पालन करून सर्व सामने पार पाडा. माझे सर्वप्रति सहकार्य तुम्हा सर्व क्रिकेट प्रेमी व आयोजकांना कायम राहील.

या क्रिकेट स्पर्धाचे नियोजन इस्राईल कुरेशी, लालूभाई मित्र परिवार, मुकदर क्रिकेट क्लब, हिंदुसूर्या क्लब, शिवक्रांती क्लब, गजानन स्पोर्ट्स क्लब यांनी केले आहे. तसेच या नियोजनास विशेष सहकार्य संघर्ष दयाळ यांनी केले.

गेल्या दीड वर्षापासून कोरणा काळातील निर्बंधांमुळे कोणत्याही खेळाडूंना खेळ खेळता आले नाहीत. म्हणून या क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे. युवा नेते शंभुराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवणार आहे. ही स्पर्धा दिनांक ०२ डिसेंबर २०२१ पासून सुरू होणार होती. परंतु, पावसामुळे या या स्पर्धेला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
संघर्ष दयाळ

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close