‘माझी वसुंधरा’ व ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ या अभियानांतर्गत पाथुर्डी येथे किर्तन सोहळा संपन्न
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शनिवार दिनांक ०४ डिसेंबर रोजी “माझी वसुंधरा अभियान” व “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अभियान” अंतर्गत ‘माझी वसुंधरा’ या विषयी कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या किर्तन सोहळ्याचे उद्घाटन करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. मनोज राऊत साहेब यांनी केले.
या वेळी पाथुर्डी गावच्या सरपंच भाग्यश्री मोटे, उपसरपंच पप्पू खरात, चेअरमन संतोष मोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चांगदेव कानडे, माजी अध्यक्ष धनंजय मोटे, पत्रकार व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शीतलकुमार मोटे, पाथुर्डी गावचे ग्रामसेवक महेश काळे भाऊसाहेब उपस्थित होते. माननीय BDO साहेबांनी आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये गावकऱ्यांनी एकोप्याने राहून आपल्या गावचा विकास साधावा असे आवाहन केले. गावच्या विकासात प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा असे सांगून विद्यार्थ्यांनी ही चांगले शिक्षण घेऊन आपली परिस्थिती सुधारावी असे प्रतिपादन केले. महेश काळे भाऊसाहेब यांनी वसुंधरा अभियाना विषयी उपस्थितांना माहिती सांगितली.
माझी वसुंधरा याविषयी पाथुर्डी गावचे व या शाळेचे माजी विद्यार्थी ह.भ.प. स्वप्नील हनुमंत शिंदे महाराज व त्यांच्या सहकार्यांनी उत्तम प्रकारे कीर्तन सादर केले. यामध्ये हनुमंत भीमराव शिंदे, ज्योतिर्लिंग काळे, अंकुश काळे, शिवाजी देवकर, भीमराव शिंदे, नागनाथ कानडे, मारूती देवकर, भारत नाळे, सुरेश खरात, दादा खरात व मृदुंगाची साथ दिलीप बेडकुते (वरकूटे) यांनी दिली. त्याचप्रमाणे महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ह.भ.प. स्वप्निल महाराज शिंदे यांनी आपल्या ओघवत्या वाणीने माझी वसुंधरा याविषयी वेगवेगळे दाखले देऊन कीर्तनातून प्रबोधन केले. यावेळी विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. महेश कांबळे, उप शिक्षीका सौ. कविता कांबळे, सौ. सुरेखा चौरे, डि.पी. चौगुले, अंगणवाडी ताई पुष्पा कोरे यांनी परिश्रम घेतले.




