-->
करमाळासामाजिक

करमाळा तालुक्यातील ‘या’ शाळेचा कौतुकास्पद उपक्रम; पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना जेवण देऊन केले स्वागत

केम प्रतिनिधी/संजय जाधव

आज संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळा सुरू झाल्यानंतर करमाळा तालुक्यातील केम केंद्र अंतर्गत असलेल्या निंभोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फरतडेवस्ती निंभोरे येथील शाळा सुरू झाली आहे. आत्ता कोरोना चा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. त्यामुळे मुलांमध्ये पुन्हा शाळेची ओढ निर्माण व्हावी म्हणून आज पहिल्या दिवशी दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना गोड पदार्थाचे भोजन देण्यात आले. या जेवणामध्ये लापशी, भात आणि भाजी यांचा समावेश होता.

सोलापूर जिल्हा परिषदेचे माननीय सी ई ओ श्री. दिलीप स्वामी साहेब आणि जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. अनिरुद्ध कांबळे साहेब यांच्या आवाहना नुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा नुकत्याच शाळा स्वच्छ आणि सुंदर झालेल्या आहेत. आता शिक्षकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना आतुरता लागली ती शाळा सुरू होण्याची, विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते मनमोकळे आणि शाळेचे वातावरण आनंदी राहावे म्हणून जिल्ह्यातील सर्वच शिक्षक खूप उपक्रम राबवत असतात. असाच मुलांचा तोंड गोड करण्याचा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. चौगुले सर व श्री. काळे सर यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला. मुलांना लापशी, भात आणि भाजी चे जेवण देण्यात आले.

आज शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थिती कमी असली तरी १ ते २ दिवसात विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती होईल असे या शाळेचे मुख्याध्यापक अरूण चौगुले यानी सांगितले. या ऊपक्रमाचे केम केंद्र प्रमुख महेश कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भैरू वळेकर, ऊपाध्यक्ष रामभाऊ वळेकर व निंभोरे ग्रामस्थांनी या शिक्षकांचे व शाळेचे कौतुक केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close