-->
करमाळाराजकियसामाजिक

पुढील आठवड्यात आवाटीचे सबस्टेशन मंजूर करणार – आमदार संजयमामा शिंदे

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

आवाटीचे सबस्टेशन येत्या आठ दिवसांत मंजूर करून या भागातील शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार असल्याचे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले. करमाळा तालुक्यातील आवाटी, निमगांव व शेलगाव येथील विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी आमदार संजय मामा शिंदे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप होते.

यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता प्रक्षाळे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता क्रमांक १ चे प्रताप कदम, उपविभागीय अधिकारी देशमुख, उपसरपंच फिरोज जाहगिरदार, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी, सरपंच प्रशांत पाटील, राजेंद्र बारकुंड, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळ, आवाटीचे सरपंच संजय नलवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब निळ, निमगाव सरपंच लखन जगताप, शेलगावचे सरपंच अशोक पाटोळे, कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे, उपसरपंच कविता वीर, ग्रामसेवक बाबासाहेब खाडे, ग्रामपंचायत सदस्य लखन डावरे, धर्मराज शिंदे, यमुना वीर, सुलोचना जगताप, रेश्मा कुकडे, रामचंद्र काटोळे, समाधान दौंड, प्रवीण शिंदे गुरुजी, गुळसडी चे माजी सरपंचमानसिंग खंडागळे, डॉ. विकास वीर, उपसरपंच श्रीकांत निळ, सुरज ढेरे, अमोल भोसले, सिद्धेश्वर जगदाळे, हनुमंत निळ, विक्रम कुंभार, सोमनाथ हलकरे, श्रीराम निळ, गणेश निळ, ऋषिकेश चव्हाण, दादा भोसले, अशोक काकडे, अशोक पाटील, महादेव डोके आदी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले की, तालुक्यातील जनतेने २०२५ ला पुन्हा एकदा संजय मामा ला निवडून द्यावे आणि ५० वर्षे मागे गेलेल्या तालुक्याला परत एकदा विकासाच्या वाटेवर आणून तालुक्याचा विकास साधण्याचे आवाहन जगताप यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close