प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


सोलापूर जिल्हा शिवसेना उपप्रमुख भारत आवताडे यांच्यासह फिसरे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश व पूर्वभागातील शेतकरी मेळावा तसेच विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ रविवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ०६:०० वाजता फिसरे येथे होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
या कार्यक्रमाला करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भारत आवताडे, फिसरे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप दौंडे, उपसरपंच संदीप नेटके, ग्रामपंचायत सदस्य विजय आवताडे, सदस्य हनुमंत रोकडे, सदस्य गणेश ढावरे यांचेसह विविध मान्यवरांचा आमदार शिंदे यांच्या गटात प्रवेश होणार आहे .
फिसरे येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख यांच्या प्रवेशामुळे आ. शिंदे गटाला पूर्व भागात बळकटी मिळणार असून त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.



