-->
करमाळामनोरंजन

‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात पार्श्वगायक प्रविणकुमार अवचर व त्यांचे सहगायकांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा शहरामध्ये प्रथमच “दिवाळी पहाट” गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था व सर्वोदय प्रतिष्ठान, करमाळा यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. याप्रसंगी करमाळा तालुक्यातील मांगी गावचे सुपुत्र पुणे येथील पार्श्वगायक प्रविणकुमार अवचर यांचे ‘लख लख चंदेरी सोनेरी’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळून अतिशय शिस्तबद्धपणे या कार्यक्रमाचे नियोजन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश (भाऊ) करे पाटील व सर्वोदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. दीपक (बापु) चव्हाण व त्यांचे सहकाऱ्यांनी केले होते.

‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमातील बहारदार गाण्यांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. पुणे येथील गायक राजू जाधव यांनी गायलेल्या प्रभू तू दयाळू या गीताला रसिकांनी खूप दाद दिली. यानंतर पार्श्वगायिका मंजुषा देशपांडे यांनी गायलेले सत्यम शिवम सुंदरम व पार्श्वगायक प्रविणकुमार यांनी गायलेला अभंग माझे माहेर पंढरी व चढता सुरज या कव्वाली ला रसिकांनी टाळ्यांचा गजरात दाद दिली. पुणे येथील उकृष्ठ निवेदक अजित वारानशिवार यांचे निवेदनात रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. वादकांनी ही वाद्यांची जुगलबंदी करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. सिंथसायझेरवरती पुणे येथील विनायकजी पवार, बासरी राजेशवरजी, ढोलक पखवाज पवन अवसरे, ढोलकी तबला शाम चांदनशिव, ऑक्टोपॅडला मनीष सबनानी यांनी विशेष साथ व संगत केली. तर साउंड साठी पुणे येथील नावाजलेले रफिक भाई साउंडचे इंजिनिअर संतोषजी यांनी छान साउंड दिला.

या दिवाळी पहाट कार्यक्रमात यशकल्याणी संस्था व सर्वोदय प्रतिष्ठान तर्फे कोविड योद्धा व कलाकार, मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी करमाळा येथील आई कमलाभवानी मातेचे प्रथमच दोन दर्जेदार गीत करणारे गीतकार, गायक व पार्श्वगायक प्रविणकुमार अवचर, गायक प्रफुल्लकुमार दामोदरे, गायक सागरजी खरात यांना विषेश सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दोस्ती बेंजोचे मालक, संगीतकार नासिरभाई शेख याना संगीतरत्न या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

यावेळी रसिकांनी केलेली फर्माईश कमलादेवीचे दर्शनाला चल हे गीत गायले. हे गीत सुरू होताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर सुरू करून गायकांना भरभरून दाद दिली.

यावेळी यशकल्याणी संस्था परिवाराचे श्री. करे पाटील साहेब, करमाळ्याचे पोलीस निरीक्षक श्री. कोकणे साहेब, पी. एस. आय. चौधरी साहेब, वाय. सी. एम. कॉलेजचे प्रदीपजी मोहिते सर, केमिस्ट भवनचे सचिन साखरे, करमाळा आगार प्रमुख आश्विनी किरगत, अंधश्रद्धा निर्मूलनचे श्री. अशोक हांडे, श्री. माने, आर पी आयचे नागेशजी कांबळे, भाजपचे जगदीश अग्रवाल, जितेश कटारिया, महेश परदेशी, मार्केट कमिटीचे सचिव श्री. विठ्ठल क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल, संदेश साप्ताहिकचे सुरजजी हिरडे, शिवसेना नेते संजय शिंदे, पुण्यातील उद्योजक श्री. संतोष दादा कांबळे, निखिल सोरटे, बागवान चाचा, श्री. खरात सर यांचेसह करमाळा शहरातील अनेक प्रतिष्ठित रसिक श्रोते उपस्थित होते. यावेळी अतिशय छान मंडप डेकोरेटर येथील शिरगिरे यांनी केले होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close