-->
करमाळामाहिती विषयकविशेषसामाजिक

दिपावली निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना दिपोत्सव साजरा करून मानवंदना

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील केम येथे गुरूवार दिनांक ०४ नोव्हेंबर रोजी दिपावली निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना शिवभक्तांकडून अनोखी मानवंदना देण्यात आली. दीपावली निमित्त भव्य दिपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात झाला. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी जय भवानीच्या जयघोषात केम गावचे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार (शिवशंभो प्रवेशद्वार) परिसर दणाणून निघाला.

केम गावाच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून दीप उत्सवास प्रारंभ करण्यात आला. शिवशंभो प्रवेशद्वार झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच, चौथरा पणत्यांनी उजळून निघाला होता. यावेळी अत्यंत प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. फटाक्यांची आतिषबाजी तसेच शेकडो पणत्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकाशमय झाला होता. या दिपोत्सवाचे आयोजन समस्त शिवशंभूभक्त व केम ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते.

या दीपोत्सवा प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव साहेब, संदिप तळेकर, अध्यक्ष सागरराजे तळेकर, सचिन जाधव, समीर तळेकर, विक्रम तळेकर, दिपक भिताडे, राकेश दोंड, गणेश तळेकर, अक्षय तळेकर, अभयसिंह तळेकर यासह असंख्य शिवभक्त व केम ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close