
✍️ शब्दांकन:- ॲड. भगवान गिरी गोसावी


मा. गणेशजी चिवटे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा… त्यांचे सर्व संकल्प आणि अपेक्षा पूर्ण करण्याची शक्ती, आरोग्य आणि मोठे यश प्राप्त होवो याच सदिच्छा…
‘निस्वार्थपणे केलेले कार्य सत्कर्माकडे नेते’ हा विचार डोळ्यासमोर ठेवून माननीय गणेश भाऊंची सामाजिक व्यावसायिक व राजकीय क्षेत्रातील वाटचाल निश्चितच प्रेरणादायी आहे.
अगदी विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने संघ परिवारातील बजरंग दल, विहिंप च्या माध्यमातून आपल्या संघटनात्मक कार्याला सुरुवात केली. ‘अन्यायाची चीड व न्यायाची चाड’ असल्याने प्रत्येक कार्यात स्वतःला झोकून देऊन संघटनात्मक कार्य करीत असताना कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात परंतु, आपल्या कार्यकर्तृत्वातून भाऊंनी कृतिशीलतेला महत्त्व देणारा, शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, चारित्र्य संपन्न आणि अभ्यासू वृत्ती असणारे नेतृत्व म्हणून आपली ओळख सर्वसामान्यांमध्ये निर्माण केली.
श्रीराम प्रतिष्ठान च्या माध्यमातून सामाजिक चळवळ उभारून अन्नपूर्णा योजना, विद्यार्थी भोजन योजना, ग्रामीण भागातील रुग्णांकरिता भोजन व्यवस्था, आपत्कालीन मदत यासारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत अखंडपणे चालू आहे. तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे. ही भूमिका ठेवून सामाजिक चळवळीतून कार्य करीत असताना फार कमी लोकांना व्यवसायिक व राजकीय यश मिळवता येतं. भाजपा तालुका अध्यक्ष, भाजयुमो सोलापूर जिल्हाध्यक्ष, करमाळा नगर परिषद नगरसेवक, आदिनाथ सहकारी साखर कारखाना संचालक यासारखी विविध विविध पदे भूषविली आहेत. करमाळा तालुक्यात भाजपाला भाऊंच्या माध्यमातून एक प्रभावी नेतृत्व लाभलं आहे. करमाळा शहरापुरती मर्यादित असलेली भाजपा पक्षाची ओळख खेड्यापाड्यात, वाडी-वस्तीवर, जनसामान्यांमध्ये पोहोचविण्यात गणेश भाऊ यशस्वी ठरले. पक्ष कार्य करीत असताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. विकासकामात राजकारण न करता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतात. जन सामान्यांमध्ये थेट संपर्क ठेवून सुखद – दुःखद प्रसंगात सहभागी होऊन कौटुंबिक ऋणानुबंध जोडले गेले आहेत. यामुळेच गणेश भाऊंकडे तालुक्याच्या राजकारणाच्या सरीपाठावरील एक उमदे व आश्वासक नेतृत्व म्हणून पाहिलं जात. व्यावसायिक, राजकीय वाटचाल करीत असताना अनेकदा संघर्ष करावा लागला. परंतु, जीवनात संघर्ष आहेच. संघर्षातून पुढे चालण्याची गती व स्फूर्ती मिळाली तर माणूस नक्कीच पुढे जाऊ शकतो. हीच बाब आपल्या कार्यकर्तृत्वातून दाखवून दिली आहे. आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे सहकारी मित्र व कार्यकर्त्यांना नेहमीच सन्मान देऊन सर्वांना प्रगतीपथावर नेण्याचे प्रयत्न केले आहेत. प्रत्येक सहकाऱ्यांना कशाप्रकारे मदतीचा हात देऊन समाजकार्याची प्रेरणा दिली जाईल यावर ते सातत्याने भर देत असून आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा…
आपली प्रगती होऊ मानसन्मान प्रतिष्ठा मिळवून आपल्या जीवनात नेहमी आनंदाचे वातावरण राहो हीच आई कमलाभवानी चरणी प्रार्थना…!
आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत..



