प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुका अध्यक्ष मा.श्री. गणेश भाऊ चिवटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करमाळा भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने करमाळ्यातील गुरु प्रसाद मंगल कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिर व सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन आज गुरुवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ०९:०० ते सायं ०५:०० या वेळेत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अमोदशेठ संचेती माजी नगराध्यक्ष करमाळा नगरपालिका व डॉक्टर संजय कोग्रेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण बोकण हे होते. तर, प्रमुख उपस्थिती म्हणून कलीम काझी सर, डॉ. वसंत पुंडे, डॉ. सादिक बागवान, डॉ. राम बिनवडे, डॉ. मोसिन पठाण, डॉ. सौ. सुनीता दोशी, दीपक पाटणे, रवींद्र बरिदे, पत्रकार शेखर स्वामी, पत्रकार डी.जे पाखरे होते. यावेळी डॉक्टर सुनीता दोशी, किरण बोकन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना डॉ. दोशी मॅडम म्हणाल्या की, करमाळा शहरात व तालुक्यांमध्ये गणेश चिवटे यांचे राजकारणा बरोबरच समाजकारणा मध्ये ही खूप मोठे योगदान आहे. यामध्ये गरीब निराधार गरजू लोकांना दोन वेळचे जेवण, ग्रामीण भागातील परंतु शहरामध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज संध्याकाळी भात-भाजी असेल तसेच दरवर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन ते करत असतात. गणेश भाऊ हे करमाळा शहराचे खरे जनसेवक म्हणून शोभतात.
या रक्तदान शिबिरामध्ये १९५ रक्तदात्यांनी आपला सहभाग घेऊन रक्तदान केले. तसेच यावेळी नेत्ररोग तपासणी व महिलांची सर्वरोग निदान तपासणी करण्यात आली. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण बिनवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन वसीम सय्यद यांनी केले.




