करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या तालुक्याचे आराध्य दैवत आई कमला भवानीच्या पावन नगरीत नावारूपास आलेल्या देवीचामाळ ग्रामपंचायत येथे सत्ता परिवर्तन होऊन पंधरा वर्षाची परंपरा मोडीत काढून देवीचामाळ या ग्रामपंचायतीवर जगताप गटाची सत्ता स्थापन झाली. आज बुधवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी या ग्रामपंचायती च्या वतीने गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी देवीचामाळ ग्रामपंचायत सरपंच महेश सोरटे, दीपक थोरबोले, ग्राम सदस्य संतोष पवार, सचिन शिंदे, अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या भूमिगत गटार व पेव्हींग ब्लॉक बसविणे या विकासकामांचा शुभारंभ जगताप गटाचे जेष्ठ नागरिक रामकृष्ण तात्या काशीद व ज्येष्ठ नागरिक साहेबराव सोरटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच नवनाथ दादा सोरटे, माजी उपसरपंच प्रमोद गायकवाड, अभिषेक चव्हाण, अर्जुन चव्हाण, सतीश दादा चोरमले, ओंकार पुजारी, केतन जगताप, सनी थोरबोले, पंकज थोरबोले, दशरथ मचाले मामा, इनुस शेख, सतीश भाऊ थोरबोले आदी मान्यवर व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.
गावकर्यांनी टाकलेल्या विश्वासावर विकासाचे राजकारण करून देवीचामाळ ग्रामपंचायत चा कारभार पारदर्शक व चांगल्याप्रकारे करणार आहे. यामुळे देवीचामाळ ग्रामपंचायत ही करमाळा तालुक्यात नक्कीच नावारूपाला येणार आहे.
श्री. महेश सोरटे सरपंच, देवीचामाळ




