-->
करमाळासामाजिक

आजी-माजी आमदारांचा पेपरबाजी करून खोटी आपुलकी मिळवण्याचा प्रयत्न -अतुल खूपसे पाटील

दिवाळी अंधारात करण्याचे महाविकास आघाडी सरकारच पाप

 

प्रतिनिधी

ऐन दिवाळीत देखील करमाळा तालुक्यातील घरगुती वीज कनेक्शन तोडण्याची तीव्र मोहीम सुरू आहे, तर शेतीपंपाची वीज ०६ तारखे पासून तोडण्याचे आदेश आहेत. एकीकडे गेल्या दोन वर्षापासून कोरोना सारख्या संकटाने जनता हैराण झाली आहे. तर दुसरीकडे महा विकास आघाडी सरकारकडून फक्त वसुली सुरू आहे. असे असताना तालुक्यातील विद्यमान आणि माजी आमदारांमध्ये सध्या उगीचच श्रेय वादाची लढाई सुरू आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आजी माजी आमदार सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत. मात्र पत्रकबाजी आणि पेपरबाजी करत जनतेची खोटी आपुलकी मिळवण्याचा अट्टाहास करत असल्याचा घणाघात जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यासह तालुक्यातील विज कपातीचे आदेश महा ‘वसुली’ सरकारने दिले आहेत. राज्यातील जनतेशी या सरकारला काही देणे घेणे नाही. दिवाळी सण हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. आणि अशा या सणामध्ये खासकरून घराघरांमध्ये रोषणाई केली जाते. मात्र, या सरकारकडून घरातच नव्हे तर सर्वसामान्यांच्या जीवनात देखील अंधार करण्याचे पाप सुरू आहे. यासाठी आजी-माजी आमदारांनी वेगी पत्रकबाजी, फोटोसेशन व पेपर बाजी केली. मात्र त्या अगोदरच महावितरणने वीज बिल मुदत वाढ करून दिली असून ती फक्त ०६ नोव्हेंबर पर्यंत असल्याचे महावितरण चे अधिकारी सांगत आहेत. घरगुती वीज कनेक्शन या काळात तोडले जाणार आहे असेही अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे गरिबांची ही दिवाळी महाविकास आघाडी अंधारात घालवणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

कोरोनामुळे शेतकरी पूर्ण कोलमडून गेला आहे शिवाय दोन्ही वर्षी अतिवृष्टीमुळे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र तरी देखील तिघाडी सरकार शेतकऱ्यांना मदत करायची सोडून त्यांना मागून फटकारे देत आहे.

आघाडी सरकारने मार्च पर्यंत मुदत वाढ द्यायला हवी होती. मात्र त्यांनी ०६ नोव्हेंबर पर्यंत दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे पुन्हा एक संकट ओढवले आहे. जर ०६ तारखेला बिल भरले नाही तर पुन्हा वीज कपात होणार असल्याचे महावितरणने सांगितले आहे.

त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी गोड होण्याच्या ऐवजी उपाशी मरण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची दशा न पाहता मार्च पर्यंत मुदत वाढ द्यावी, असे आवाहन अतुल खूपसे यांनी दिले आहे.

येत्या ०६ नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या विजेसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. ०६ तारखे नंतर वीज पुरवठा पुन्हा खंडित करण्यात येणार आहे. सध्या घरगुती विजेसाठी कोणत्याही प्रकारची मुदत वाढ देण्यात आली नाही. तरी शेतकऱ्यांनी वीज बिले भरावीत.
सुमित जाधव
उपकार्यकारी अभियंता
करमाळा

 

महाराष्ट्रातील सर्व आमदार महोदयांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली. त्यामुळे शेती पंपाच्या वीज तोडणी वर अवघ्या दहा दिवसाची मुदतवाढ मिळाली. घरगुती वीज तोडली जाणार आहेच. यावर कोणी बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांचे ऊस आत्ता गाळपासाठी जात आहेत. त्यांच्याकडे लगेचच पैसा कोठून उपलब्ध होणार ? असा सवाल करून आजी-माजी आमदारांनी सत्तेचा वापर करून विज बिल मार्चनंतर भरण्यात यावे अशी तरतूद करून दाखवावी असे आवाहन खूपसे पाटील यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close