-->
आरोग्यराज्यसामाजिक

कोरेगाव भीमा येथील ५ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण

 

 

कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

कोरोना प्रतिबंधक लस कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आता पर्यंत ५००० पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विराज रमेश भांडलकर, डॉ. संतोष थिटे यांनी सांगितले.

 

कोरेगाव भीमा परिसरात औद्योगिक वसाहत असल्याने गावात सणसवाडी, लोणीकंद आदी भागातील कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार कोरेगाव भिमामध्ये राहतात. काही महिने सुरुवातीला लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने नागरिकांना लस घेण्यासाठी भल्या पहाटे रांग लावावी लागत होती. परंतु गेले तीन दिवस मिशन कवच कुंडल योजनेअंतर्गत दररोज ८०० पेक्षा जास्त डोस उपलब्ध होत असल्याने नागरिकांना सहजपणे पहिला व दुसरा डोस उपलब्ध होत आहे. यावेळी नागरिकांना योग्य पद्धतीने लस मिळावी यासाठी कोरेगाव भीमाचे सरपंच अमोल गव्हाणे, उपसरपंच शिल्पा फडतरे, माजी सरपंच संदीप ढेरंगे, विजय गव्हाणे, केशव फडतरे, संपत गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य परिश्रम घेत असतात.

 

लसीकरण साठी आशा सेविका मंगल खरात, सुनीता काकळीज, अमृता गव्हाणे, अश्विनी फडतरे, सोनाली राऊत, सिस्टर कोकिळा कराळे यांच्यासह सागर गव्हाणे, राजू गवदे, आनंदा पवार, नितीन गव्हाणे, सुनील सव्वाशे, सुरेश भांडवलकर, किरण नानगुडे, तात्यासाहेब साळुंखे, बबलू शिंदे आदी मदत करत आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close