केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथे मा. अजित दादा तळेकर यांनी त्यांच्या वडिलांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, सोलापूर जिल्हा भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तसेच करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनातून नवीन संकल्पना घेत सोलापूर जिल्ह्यामध्ये केम ग्रामपंचायत ही आदर्श ग्रामपंचायत करण्यासाठी यथाशर्थीचे प्रयत्न करून केम गावामध्ये सामान्य नागरीकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तात्काळ वैद्यकीय सेवा मिळाव्यात म्हणून नवीन रुग्णवाहिका खरेदी केली आहे.

गेल्या दीड वर्षात लॉकडाऊन च्या काळामध्ये कित्येक कोविड पेशंटना मोठ्या दवाखान्यात दाखल होण्यासाठी रुग्णवाहिका तर नाहीच पण खाजगी गाडी देखील भाड्याने मिळत नव्हती. केम येथील विवाहित पुजा जाधव या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाला. जर या महिलेला वेळीच करमाळा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असते तर तीचे प्राण वाचले असते. परंतु, केवळ रुग्णवाहिका नसल्याने व कोणी गाडी भाड्याने दिली नाही म्हणून त्या महिलेचा मृत्यू झाला. यामुळे केम ग्रामपंचायतीने ठरवले की, गावापासून सर्व मोठे वैद्यकीय दवाखाने ७० ते ११० किलोमीटर च्या अंतरावर आहेत. शासनाकडील रुग्णवाहिका नेहमी डिझेल व इतर कारणामुळे वेळेवर सेवा देत नसल्यामुळे गंभीर रुग्णावर तातडीने उपचार होत नाहीत. त्यामुळे केम गावं व पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी जाण्याची सोय व्हावी म्हणून केम ग्रामपंचायतीने स्वतःच्या मालकीची रुग्णवाहिका खरेदी केली आहे.
दसऱ्यानिमित्त महंत जयंतगिरी महाराज व जेष्ठ नेते दिलीप दादा तळेकर, किंगमेकर अजित दादा तळेकर यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेची लोकार्पण सोहळा शुक्रवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९:०० वाजता गांधी चौक केम येथे पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे होते. यावेळी डॉक्टर तळेकर, डॉक्टर पालखे, उपसरपंच नागन्नाथ तळेकर गुरूजी, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी मनोगत आपले व्यक्त केले.
यावेळी डॉक्टर पालखे, डॉक्टर कुरडे, डॉक्टर सुरवसे, डॉक्टर ताकमोगे, डॉक्टर विशाल जगदाळे, मनोज सोलापूरे, राहुल कोरे, उमेश तळेकर, महेश तळेकर सर, सागर दौंड, माजी पंचायत समिती सभापती शेखर गाडे, तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ आप्पा तळेकर, अनंता तळेकर, नामदेव तळेकर, चेअरमन बापुराव तळेकर, गणेश तळेकर, महावीर आबा तळेकर, अच्युत काका पाटील, समीर तळेकर, सागर तळेकर, अविनाश तळेकर, मिलिंद नरखेडकर, बाळु अवघडे, सागर गोडसे, श्रीहरी भैय्या तळेकर, सचिन बिचीतकर, दत्तात्रय बिचीतकर तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



