-->
करमाळाकृषी विषयकसामाजिक

संदीप भोंडवेंचे भामा आसखेड पुनर्वसन शेरे कमी करण्यासाठीचे आमरण उपोषण अखेर मागे

कोरेगांव भीमा प्रतिनिधी /गजानन गव्हाणे पाटील

भामा आसखेडचे लाभ क्षेत्रातील सातबाऱ्यावरील पुनर्वसनाचे व इतर शेरे कमी करण्यासाठी कार्यवाही होणार असल्याचे हवेली तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या वतीने हवेली तालुक्याचे नायब तहसीलदार अजय गैंगाणे यांच्या हस्ते आश्वासनाचे लेखी पत्र भामा आसखेड विरोधी कृती समितीचे अध्यक्ष पै. संदिप भोंडवें सह उपोषण कर्त्यांना मिळाल्याने पेरणे फाटा, तालुका हवेली येथे सुरू असलेले पूर्व हवेली, दौंड व खेड, भामा आसखेड अन्यायग्रस्त बाधित शेतकरी व विरोधी कृती समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली व शेकडो शेतकरी यांनी भामा आसखेड शासनाच्या चुकीचा धोरणाबाबत चालू असलेले आमरण उपोषण पाणी व रस घेऊन सोडण्यात आले.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिपदादा कंद यांनी उपोषण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद, पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, भाजपचे जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, पेरणेचे जेष्ठ नेते दादासाहेब माने, पेरणेचे माजी उपसरपंच राजेंद्र वाघमारे, माजी उपसरपंच रविंद्र वाळके, यशवंतचे माजी संचालक श्रीहरी कोतवाल, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक विपुल शितोळे, पेरणे तंटामुक्तीचे अध्यक्ष दशरथ वाळके, श्रीमंत झुरूंगे, उत्तमराव भोंडवे, अमित गोते, भाऊसाहेब झुरुंगे, बुर्केगावचे सरपंच संतोष पवळे, भाऊसाहेब शिंदे, विक्रम गायकवाड, अमृता पठारे, अतुल वाळके, ज्ञानेश्वर शिवले, केतन कोलते, नवनाथ पोटफोडे, हिंगणगावचे माजी सरपंच अंकुशराव कोतवाल, संतोष गायकवाड, विकास तळेकर, विजय पायगुडे, माऊली ठोंबरे, पेरणेच्या माजी सरपंच रोहिणी वाळके, शिवाजी वाळके आदी हवेली, खेड, दौंड मधील असंख्य बाधित शेतकरी व पूर्व हवेलीतील विविध गावचे आजी, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

भामा आसखेडचे सातबाऱ्यावरील पुनर्वसनाचे शेरे कमी करण्यासाठी कार्यवाही होणार असल्याच्या हवेलीचे तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्र शासन यांचेकडील ५ ऑगस्ट २०१९ रोजीचा शासन निर्णयानुसार भामा आसखेड प्रकल्पाच्या हवेली तालुक्यातील लाभ क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत व भविष्यातही अशा सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता नाही. अशा स्लॅबधारक खातेदारांच्या जमीन हस्तांतरित व्यवहारातील असलेले निर्बंध उठविणेबाबत प्रस्ताव मान्यताकामी महाराष्ट्र शासन यांचेकडे सादर करण्यात आलेले आहे. हे प्रस्ताव मान्यता मिळाल्यानंतर हवेली तालुक्यातील भामा आसखेड प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील इतर अधिकारातील पुनर्वसनाचे शेरे कमी करण्यात येणार आहेत. तरी महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त होताच भामा आसखेड लाभ क्षेत्रातील इतर अधिकारातील पुनर्वसनाचे शेरे कमी करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

गरज पडल्यास आझाद मैदानावर उपोषण व आंदोलनासाठी जाण्याची आमचीही तयारी- प्रदिप विद्याधर कंद (माजी अध्यक्ष जि. प. पुणे)

आम्ही या उपोषण संदर्भात भामा आसखेडचे सातबाऱ्यावरील पुनर्वसनाचे शेरे त्वरित कमी करण्यासाठी शासन स्तरावर विविध अधिकाऱ्यांना भेटलो. त्यावेळी अधिकाऱ्यांनी सकारात्मक बोलून निर्णय देत सहकाऱ्यांची भूमिका दाखवली आहे. जर यापुढे शेरे कमी केले नाही तर शेतकरी आक्रमक होणार असून मोठे जनआंदोलन उभारले जाईल. वेळ आली तर आझाद मैदानावर उपोषण व आंदोलनासाठी जाण्याची आमचीही तयारी आहे. त्यामुळे उपोषणकर्ते व आमच्या बाधित शेतकऱ्यांचा त्वरित शासनाने विचार करून दखल घ्यावीत. असे उपोषण सोडताना मत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप विद्याधर कंद यांनी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close