केम प्रतिनिधी/संजय जाधव


सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. अनिरुद्ध (आण्णा) कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेस सोलापूर जिल्ह्यासाठी २४ कोटी ७५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी करमाळा तालुक्यासाठी २ कोटी ८७ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. नेहमीच करमाळा तालुक्याला आदरणीय अध्यक्ष साहेब यांनी झुकते माप दिलेले आहे. म्हणतात ना जर वाढप्या आपला असला तर नक्कीच ताटात दोन घास जास्त पडल्याशिवाय रहात नाहीत. त्याचप्रमाणे आज तालुक्यातील विविध विकास कामांना निधी आज अध्यक्ष यांच्या प्रयत्नातून मिळत असलेला पहायला मिळत आहे.
करमाळा तालुक्याचे माजी आमदार श्री. नारायण (आबा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते मा. श्री. अजित (दादा) तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तालुक्यातील विविध विकास कामे तळागळातील जनतेपर्यंत पोहचवली जात आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या निधीतून तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये गावंतर्गत कामे, वाड्या वस्त्यांवरील पोहच रस्ते, सभामंडप, वाचनालय, सिमेंट रस्ते, पाणी पुरवठा योजना, विजेचे दिवे अशी अनेक विकासकामांचे योग्य पद्धतीचे सध्या तालुक्यात चालू आहेत.
तालुक्यातील विविध विकास कामांच्या बाबत सध्या अध्यक्ष या नात्याने तालुक्यात बरीच कामे आज मार्गी लागत आहेत. त्यांच्या बरोबर करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सर्व सदस्य यांचेही तितकेच योगदान तालुक्याला मिळाले आहे.



