-->
करमाळाराजकियसामाजिक

जलजीवन मिशन योजने अंतर्गत करमाळा तालुक्यासाठी ४ कोटी निधी मंजूर; आ. संजयमामा शिंदे यांची माहिती

 

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

करमाळा विधानसभा मतदार संघातील पाणी पुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन योजनेतून तालुक्यातील ४ गावांना एकूण ३ कोटी ८४ लाख ८५५ रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

यामध्ये तालुक्यातील चिखलठाण नंबर १ व २ या गावांसाठी १ कोटी ९८ लाख ७६६ रुपये तसेच वांगी नंबर १ व २ या गावांसाठी १ कोटी ८६ लाख ८९ रुपये अशी तरतूद केली गेलेली आहे. या निधीमधून संबंधित गावात विहीर ते गाव अशी पाईपलाईन, गावांतर्गत पाईप लाईन, पाण्याची टाकी, जलशुद्धीकरण केंद्र इत्यादी कामे केली जाणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत सदर निधी मंजूर झालेला असून यामध्ये १० टक्के लोकनिधी संबंधित गावाने भरणे अपेक्षित आहे. उर्वरित रक्कम केंद्र शासनाकडून ५० टक्के व राज्य शासनाकडून ५० टक्के दिली जाणार आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close