करमाळा
कंदर येथे आमदार शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन
करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील मौजे कंदर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन विकासप्रिय आमदार मा. संजयमामा शिंदे यांच्या हस्ते शुक्रवार दि. २४ सप्टेंबर रोजी करण्यात आले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते विठ्ठल मंदिर या संत निवृत्तीनाथ पालखी मार्गाचे व शहानूर बाबा दर्गा सभामंडप या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी कंदर गावचे जेष्ठ नेते मा. नवनाथमालक भांगे, कंदरचे सरपंच प्रतिनिधी मा. भास्कर आण्णा भांगे, उपसरपंच मा. मौलासाहब मुलाणी, चेअरमन मा. हरीभाऊ गरड, माजी जि. प. सदस्य मा. उध्दवदादा माळी, ग्रा. पं. सदस्य मा. अमर भांगे, जेष्ठ नेते मा. शब्बीरशेठ जहागिरदार, युवा नेते मा. आण्णा पवार, पै. मा. उमेश इंगळे, पत्रकार मा. आबा साळुंखे, मा. धनंजय मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.



