करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील शेलगावं (वांगी) येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन सरचिटणीस मा. धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी केकाण कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. शेलगाव येथील आत्माराम केकान व कमल केकान यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. तसेच शेलगाव येथीलच किसन खाडे यांचेही वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांचे वय वर्षे एकशे दहा होते. यावेळी त्यांनी खाडे कुटुंबीयांची ही सांत्वन पर भेट घेतली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दराडे गुरुजी यांच्या घरी चहापाणी व सत्कार संपन्न झाला. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा सत्कार शेलगाव चे सरपंच अमर ठोंबरे यांनी केला. तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दराडे गुरुजी यांनी केला.
यावेळी बाळासाहेब बेरे, आदिनाथचे माजी संचालक धनंजय खाडे, ग्रामपंचायत सदस्य भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय पोटे, भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंके, कंदर चे बंडू माने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुशील शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत केकान, ग्रामपंचायत सदस्य कैलास ठोकळ, संतोष केकान, देशमुख भाऊसाहेब, महेंद्र लोंढे, अमोल दराडे, बंटू गुरव, युवराज काळे उपस्थित होते.



