-->
करमाळासामाजिक

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसा निमित्त केजी युथ फाउंडेशनच्या वतीने विविध विकास कामाचे भूमिपूजन

 

हवेली प्रतिनिधी/कलिदास गावडे

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय महिला अध्यक्ष सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम करून साजरा करण्यात येत आहे. थेऊर येथील केजी युथ फाउंडेशन च्या वतीने सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसा निमित्त थेऊर येथील वार्ड क्रमांक १ राजे उमाजी नाईक समाज मंदिर ते जिल्हा परिषद शाळा बंदिस्त गटर लाईन व रस्ता कॉंक्रिटीकरण, वार्ड क्रमांक ४ मध्ये आखाडे वस्तीतील २०० मीटर बंदिस्त गटार लाईनचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच, दहावी बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार, ग्रामपंचायती मधील वरिष्ठ लिपिक चाळीस वर्षे सेवा केल्याबद्दल मारुती राऊत यांचा सत्कार करण्यात आला. ह.भ.प. ज्ञानोबा (आबा) कुंजीर यांचा स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, थेऊर पोलीस चौकी ते यशवंत सहकारी साखर कारखाना रस्त्याच्या कडेला वाढलेली गवत कापण्यात आले व रस्ता स्वच्छ करण्यात आला.

यावेळी भूमीपूजन करत असताना स्थानिक वार्डातील नागरिकांच्या वतीने तेथील कामाचे भूमीपूजन करण्यात आले त्यामुळे फौंडेशनच्या वतीने कुठल्याही प्रकारचा बडेजावं न करत स्थानिक नागरिकांना प्राधान्य दिल्याने नागरिक समाधान व्यक्त करताना दिसत आहे.

यावेळी उपस्थित आर पी आय पुणे शहर संपर्क प्रमुख व पुणे मनपा मा. नगरसेवक अशोक कांबळे, आर पी आय युवक आघाडी अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, हवेली ता. अध्यक्ष मारुती कांबळे, मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष खंडू गावडे, दलित महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष आनंद वैराट, आर पी आय युवक सरचिटणीस महिपाल वाघमारे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड ग्रामपंचायत सदस्या गौतमी कांबळे, पुणे जिल्हा युवकचे बाबा मोरे, प्रसिद्ध प्रमुख राजू गायकवाड, मा ग्रा स राजेंद्र कांबळे सा का, राहुल गायकवाड, मिलिंद गुरव, धम्मकिरण कांबळे, योगेश गावडे दत्तात्रय गावडे देविदास गावडे, वर्कस चव्हाण, सचिन आखाडे सचिन राऊत, भाऊसाहेब गावडे आदी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close