-->
करमाळाराजकियसामाजिक

करमाळा माढा मतदार संघातील गावांना जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मंजुरी मिळावी; आ. संजयमामा शिंदे यांची गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

 

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील जेऊर व २९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, बोरगाव व १२ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, कोर्टी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, कव्हे व १५ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, व्होळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मधील गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर होणे आवश्यक आहे.

सदर गावे ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमध्ये येत असल्याने सदर गावांना स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करता येत नाहीत. सदर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या हंगामी स्वरूपाच्या असून त्या फक्त टंचाईच्या काळातच चालविल्या जातात. त्यांचा टंचाई काळ संपल्यानंतर सदर योजना बंद राहतात. या योजना २० वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या असल्याने त्यांची दुरुस्ती व गळतीचे प्रमाण जास्त असल्याने सर्व गावांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही.

 

तरी वरील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमधील गावांना स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यासाठी शासनाच्या जल जीवन मिशन योजने अंतर्गत प्रादेशिक योजनेमधील गावांचा जल जीवन मिशन आराखड्यामध्ये समावेश असून सदर गावांना स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी आपली स्तरावर करमाळा माढा विधानसभा मतदारसंघातील गावांची स्वतंत्र मीटिंग लावावी अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेली असून या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरच सदर बैठक लावू असे आश्वासन मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close