-->
महिलाविषयकविशेष

क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट संस्थेकडून अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना कथा सादरीकरणाचे धडे

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (QUEST) संस्थेमार्फत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पालवी अंतर्गत अंगणवाडी प्रकल्प सुरु असून हे प्रकल्प रंभा फिलांथ्रोपी फौंडेशन (RPF) यांच्या सहयोगातून सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत दि. १७ व १८ ऑक्टोबर २०२४ रोजी सिन्नर प्रकल्पातील मॉडेल अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षीकांसाठी कथा सादरीकरण करणे याबाबतची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत प्रतिक्षा खासनिस व प्राजक्ता कवळेकर या प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ललित कला केंद्र येथून नाटक या विषयात पदवी मिळवली आहे. नाटक, शिक्षण आणि लहान मुलं या विषयावर या गेले अनेक वर्ष संशोधन आणि काम करतात.

 

३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांना शिकवताना त्याची अवधान कक्षा लक्षात घेऊन दोन अडीच तास शिकवणे हे मोठे कौशल्याचे काम असते. मुलांसोबत काम करताना अनेक कौशल्य अंगणवाडी सेविकांना अवगत असणे गरजेचे आहे. मुलांना गोष्ट सांगणे ही मोठी कौशल्याची बाब आहे. गोष्ट सांगताना अवाजात चढउतार कसा करावा? वेगवेगळी पात्र साकारताना आवाजाची पट्टी कोणती असावी? पात्रानुसार हावभाव कसे असावेत? या बाबत कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. तसेच श्वासाचे वेगवेगळे व्यायमही यावेळी शिकविले. दुसऱ्या दिवशी शेवटच्या सत्रात सर्व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांनी वेगवेगळ्या गोष्टींचे सादरीकरण केले.

 

या कार्यशाळेला महिला व बालकल्याण विभाग नाशिकचे उपमुख्य कार्यकारी मा. प्रताप पाटील साहेब, सिन्नरचे बालविकास प्रकल्प अधिकारी मा. गणेश सहाणे साहेब यांनी भेट दिली. अंगणवाडी सेविकांनी गोष्टींची केलेली सादरीकरणे पाहून त्यांचे कौतुक केले. या प्रकारची संधी त्यांना मिळाली हे अंगणवाड्यासाठी खूप महत्वाचे आहे. या कार्यशाळेचा खूप फायदा अंगणवाडी सेविकांना मुलांबरोबर काम करताना तर होणारच आहे, त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही होणार आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close