-->
करमाळासामाजिक

यश मिळवणं सोपं असतं; त्यासाठी फक्त ‘या’ गोष्टी आत्मसात कराव्या लागतात

 

शब्दांकन✍🏻
वैजयंता महेश गजरे.( B.Sc, B.ed, MBA)
अध्यक्षा:  अर्थ सोशल फांउडेशन , पुणे.

यश मिळवणं सोपं असतं फक्त त्यासाठी आपल्याला यश मिळवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे ध्येय निश्चित केले आहे त्या ध्येयाकडे आपल्याला वाटचाल करावी लागते.

“प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे”

यश हे अशी गोष्ट आहे की ते मिळवण्यासाठी आपल्याला अतोनात कष्ट करावे लागतात . कष्ट जर आपण योग्य दिशेने केले तर यश निश्चितच आपले असते .आपण पाहिलं आहे की ज्या यशस्वी, सुप्रसिद्ध व्यक्ति आहेत ते काही यशाच्या शिखरावर एका दिवसात पोहोचलेले नाहीत. त्यासाठी त्यांनी लहानपणापासून अतोनात कष्ट केलेले असतात तेव्हा कुठे ते त्या एका उच्च जागेवरती विराजमान होतात. जीवनामध्ये आपण अशा ध्येयाकडे नेणाऱ्या सवयी लावल्या तर आपण निश्चितच ध्येय गाठण्यात यशस्वी होत असतो.

यशाची गुरुकिल्ली:-

१. जर आपल्याला गरुडासारखी उंच भरारी घ्यायची असेल तर सुरुवातीला आपण बदकांबरोबर पोहणे थांबले पाहिजे. याचा अर्थ असा की आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये यश निर्माण करण्याची इच्छा आहे त्या इच्छेच्या दृष्टिकोनातून आपण ते ध्येय गाठण्यासाठी जे अनुभवी व्यक्ती आहेत किंवा जी पुस्तक आहेत त्यांचा अभ्यास करणे व अशा लोकांच्या संपर्कात राहणं गरजेचं असतं. चुकीच्या लोकांच्या संपर्कात राहिल्याने आपल्याला योग्य ध्येय कधीही गाठता येणार नाही.
२. द्राक्षाचा वेल लिंबावर गेला कडू का झाला संगतीमुळे . या म्हणीप्रमाणे जर द्राक्षाचा वेल कडू निंबाच्या झाडावर गेला तर त्याचे दात द्राक्ष सुद्धा करू लागतात म्हणूनच संगत ही खूप महत्त्वाची असते चांगल्या विचारांच्या स्वभावाचा प्रेरणा देणाऱ्या लोकांच्या संपर्कात आपण राहिलो तर आपली प्रगती होत राहते.
३. यश ही काही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही त्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये यशाकडे घेऊन जाणार या सवयींचा अवलंब आपल्याला करावा लागतो ‌.

यशस्वी लोकांच्या पाच सवयी:-
१. यशस्वी व्यक्तीचा स्वतःच्या कर्तबगारीवर पुर्ण विश्वास असतो. जर तुम्हाला एखादं ध्येय गाठायचं असेल तर तुम्ही ते ध्येय गाठण्यासाठी पात्र व्यक्ती आहात हा विश्वास तुम्हाला यश मिळवून देतो.
२. ध्येय निश्चित करा व ते एका कागदावर ठळक अक्षरांमध्ये लिहून ठेवा की जे तुम्ही रोज येता जाता पाहू शकता.
३. ध्येयाकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गावर कितीही अडथळे आले तरी तुम्ही तुमचा मार्ग अर्ध्यात सोडू नका.
४. निरंतर प्रयत्न आणि यश मिळवण्यासाठी केलेली खटपट यातून तुम्हाला एक दिवस ध्येय साध्य होतेच आणि ते साध्य झालेली ध्येय तुम्हाला समाधान मिळवून देते.
५. यश मिळवल्यानंतर त्या यशाच्या उर्मिला हरपून न जाता केलेले कष्ट अविरत चालू ठेवा आणि त्याच्या पुढील ध्येय तुम्ही निश्चित करू शकता.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही कुठल्याही गोष्टीची न घाबरता सुरुवात केली तर शेवट हा नेहमी गोडच होत असतो.

मी तरुण पिढी व विद्यार्थ्यांना असे आवाहन करते की त्यांनी यशासाठी खडतर प्रयत्न करून जीवनात यशस्वी व्हावे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close