-->
करमाळाराजकिय

जबाबदारी दिली तर शिवसेना पक्ष वाढीसाठी निष्ठेने काम करू- अॅड. अजित विघ्ने

 

 

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

शिवसेना पक्षाबद्दल मला बालपणापासून आवड असून मी लहान असतानाच शिवसेनेमध्ये काम केलेले आहे. शाखा प्रमुख, विभाग प्रमुख या जबाबदारीच्या पदावरही मी काम केले आहे. यामुळे भविष्यात पक्षाने जबाबदारी दिली तर निष्ठेने आणि सर्व आजी, माजी, जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेना पक्ष वाढीसाठी काम करेन असे मत केत्तुरचे माजी सरपंच ॲड. अजित विघ्ने यांनी व्यक्त केले आहे.

 

यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचे माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांचेबरोबर काम करीत असुन, यापुर्वी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख स्व. शिवाजीराव मांगले साहेब, माजी मंत्री स्व. दिगंबर बागल, माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे नेतृत्वाखाली काम केलेले आहे. राजकीय क्षेत्रातील सर्व गटातटातील नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी माझा जवळीकतेचे संबध आहेत. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख मा. प्रा. अजयजी दासरी, धाराशिव मतदार संघाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचेशी ही सलोख्याचे संबध आहेत.

 

करमाळा तालुक्यातील सर्व जुन्या शिवसैनिकांच्या बरोबर एकत्रीत कामामुळे संबध दृढ आहेत. करमाळा तालुक्यातील शिवसेना पक्षातील मरगळ काढण्यासाठी आजी, माजी, जुन्या, नवीन व सर्व शिवसेना समर्थकांचा तसेच शिवसैनिकांचा मेळ घालुन शिवसेना पक्ष वाढीसाठी जबाबदारीने प्रयत्नशिल राहीन. वास्तविक, सध्या करमाळा तालुक्यातील दोन सक्षम नेते शिवसेनेचे प्रतिनिधित्व करीत असले तरी, कार्यकर्त्यांचा मात्र आवमेळ आहे. त्यातच जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांना कधीच न्याय मिळाला नाही.

 

तरटगावचे सरपंच डॉ. अमोल घाडगे यांचेसारखे अनेक सुशिक्षित तरुण शिवसेने मध्ये काम करण्यास इच्छुक आहेत. परंतु, पुर्वीचे असणारे पदाधिकारी नवीन व तरुण शिवसैनिकांना देत नाहीत. वास्तविक त्यांनी आता ज्येष्ठतेनुसार युवा व निष्ठावान कार्यकर्त्यांना पदावर विराजमान होणेसाठी प्रयत्न केले पाहीजेत. तसेच पक्ष वाढीसाठी आपल्या पदाचा त्याग करून नवीन शिवसैनिकांना संधी दिली पाहिजे. माजी जिल्हा प्रमुख प्रा. अजयजी दासरी आणि काही प्रमुख शिवसेना नेतेमंडळी यांनी याबाबत माझेशी चर्चा केली असुन, सर्व नेत्यांच्या सहमतीने जबाबदारी मिळाल्यास ती नक्कीच यशस्वीपणे पार पाडून दाखवेन असेही शेवटी बोलताना ॲड. विघ्ने म्हणाले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close