-->
कृषी विषयक

शिवराई फाउंडेशनचे आमदार यशवंत तात्या माने यांना विविध विकास कामांसाठी निवेदन…

 

 

माय मराठी न्युज नेटवर्क

 

लोकनेते बळीराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली रानमसले येथील शिवराई फाउंडेशन कडून मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत तात्या माने यांना विविध विकास कामांसाठी लेखी निवेदन देण्यात आले. तसेच आमदार यशवंत माने यांचा शिवराई फाउंडेशन च्या वतीने आंब्याचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.

सदर निवेदनामध्ये रानमसले ते वांगी रस्ता डांबरीकरण करणे, जल जीवन मिशन अंतर्गत कामे, आमदार निधीतून विकास कामे, दलित वस्ती सुधारणा अंतर्गत कामे, वाचनालय, अंगणवाडी सुधारणा करणे, प्रकाश पाटील यांचे घर ते ग्रामपंचायत प्रांगण सिमेंट रस्ता, संत सावतामाळी सभामंडप, भगीरथ योजना लवकरात लवकर कार्यान्वित करणे, आरोग्य विभाग सुविधा, चिंचोली एमआयडीसी – CSR बाबत, गाव तलाव तसेच ग्रामदैवताच्या मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे अशा विविध विकास कामांची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

 

रानमसले गावातील विविध विकास कामांची मागणी शिवराई फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत आमदार यशवंत तात्या माने यांना दिली आहे. यावेळी आमदार साहेबांनी ही लवकरात लवकर भगीरथ योजनेतून सिंगल फेज विजपुरवठा सुरु करणार तसेच रानमसले ते वांगी या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करू अशी माहिती शिवराई फाउंडेशन चे अध्यक्ष अरविंद गारड यांनी दिली आहे. यावेळी शिवराई फाउंडेशनचे अध्यक्ष अरविंद उद्धव गरड, गोपाळ आत्माराम गरड, प्रभाकर गायकवाड, लक्ष्मण शिंदे, नंदकुमार गरड ,विकास गायकवाड, संतोष ननवरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close