केम प्रतिनिधी/संजय जाधव


हा महाराष्ट्र साधूसंताचा महाराष्ट्र, शिव, शाहू, फुले – आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. ह्या पावन भूमित रोज स्त्री लैंगिक अत्याचार वाढत चालले आहे. याला कुठे तरी अंकुश लावणे गरजेचे आहे. महाराष्ट्र रोज ओशाळत असताना ते कुठे तरी थांबणे गरजेचे आहे.
७ सप्टें रोजी – पुण्यात १४ वर्षाच्या मुलीवर १३ नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.
९ सप्टें रोजी – पुण्यात ६ वर्षांच्या चिमुकली वर अपहरण करून बलात्कार.
९ सप्टें रोजी – खेड मध्ये १२ वर्षांच्या मुलीवर २ महिने ६ दिवस नराधमांकडून बलात्कार
१० सप्टें रोजी – मुंबईत महिलेवर अत्याचार, गुप्तांगाला केलेल्या जखमा, पीडितेचा म्रुत्यु
ही सगळी कृत्ये शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अतिशय घृणास्पद रित्या घडत आहेत.
५ वर्षे उलटून गेली कोपर्डी च्या ताईला न्याय मिळाला नाही. शिवरायांनी स्त्री अत्याचारा विरोधात केलेला चौरंगा कुठे आणि आपला फास्ट ट्रॕक चा बोलबोला कुठे? बलात्काऱ्यांना फक्त एकच शिक्षा ती म्हणजे मृत्यूदंड (फाशी) तीही एक महीन्यात अमंल बजावणी करावी. तर आणि तरच अश्या कृत्याला कायमचा आळा बसेल. असे सांगत काही मागण्या संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून पत्राव्दारे मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत.
१. “स्त्री” जातीला शस्त्र बागळण्यास परवानगी देण्यात यावी.
२. अत्याचाराचा प्रतिकार करताना स्त्रीकडून कितीही गंभीर गुन्हा घडला तरी तिला कोणतीही शिक्षा देऊ नये.
३. बालवाडी पासूनच सर्व प्रकारची शस्त्रे चालवण्याचा अभ्यासक्रम सक्तीचा असावा.
४. लैंगिकतेसंबंधीच्या गुन्ह्याला विनाविलंब मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी.
५. समाजमाध्यमे आणि इलेक्ट्रीक मिडीयात जो स्त्रीदेहाचा बाजार मांडला जातोय, त्याला कायद्याने चाप लावावा.
या सर्व मागण्या आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने करीत आहोत. या वर तातडीने लक्ष देवून योग्य ती कारवाई आपण करावी ही अपेक्षा अन्यथा, या विषयासह संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आंदोलन पुकारू असेही संभाजी ब्रिगेड चे पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितिन खटके यांनी सांगितले.




