
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


विश्व हिंदू परिषद बजरंग दल करमाळा प्रखंडाच्या वतीने आज बुधवार दि. ११ डिसेंबर रोजी करमाळा शहरातील खोलेश्वर मंदिरासमोरील सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात ९६ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन विश्व हिंदू परिषदेचे संतोषजी वाळुंजकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. श्रीराम परदेशी, प्रमोद फंड, अनंता मसलेकर, संग्राम परदेशी, भाजपाचे गणेश चिवटे, संजय घोरपडे, गणेश महाडिक, शशिकांत पवार, नरेंद्र ठाकूर, दीपक चव्हाण यांच्या हस्ते प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, गोळवलकर गुरुजी व भारतमाता यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर व्हावे ही इच्छा ठेवून श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे कारसेवक व हुतात्मे कोठारे बंधूंच्या स्मरणार्थ दरवर्षी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने देशभरात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने करमाळा तालुका बजरंग दलाच्या वतीने ही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ९६ बजरंगींनी रक्तदान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी बजरंग दलाचे विभाग संयोजक ऋषिकेश चव्हाण, जिल्हा सहसंयोजक लिंगेश्वर तकटे, दादा चव्हाण, नवनाथ शिंदे, समाधान कांबळे, संकेत दयाळ, करण आल्हाट, अंगद भांडवलकर, संतोष कांबळे तसेच रा.स्व. संघाचे स्वयंसेवक व बजरंग दलाचे कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले. यावेळी रक्त संकलन करमाळा येथील कमला भवानी ब्लड सेंटरच्या वतीने करण्यात आले.



