-->
करमाळासामाजिक

स्व. दादासाहेब जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हिवरे येथे रक्तदान शिबिर संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील मौजे हिवरे येथील माजी उपसरपंच मोतीराम जगताप यांचे जेष्ठ चिरंजीव दादासाहेब जगताप यांचे गेल्यावर्षी अल्पशा आजाराने वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले होते. स्व. दादासाहेब जगताप यांचे वडील व भाऊ जरी राजकारणात सक्रिय असले तरी संपूर्ण जगताप परिवार गावातील धार्मिक कार्यात नेहमीच हिरारीने सहभाग घेत असत. तसेच सर्व जाती धर्मातील लोकांच्या सुख दुःखात सहभागी असायचे.

मात्र, मोतीराम जगताप यांच्या मुलाचे ऐन उमेदीत असताना निधन झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. स्व. दादासाहेब हे निर्व्यसनी, शांत व मितभाषी होते. गावातील लहान-थोरांशी त्यांचा सवांद होता. त्यामुळे सर्वांना प्रंचड दुख झाले होते.

आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन फक्त एका दिवसात अचानक ठरल्याने व पूर्वनियोजन नसताना देखील ६५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन स्व. दादासाहेब यांच्या स्मृतीस अभिवादन केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन ह.भ.प. चंद्रभान महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. तर, रक्त संकलन करण्याचे काम बार्शी येथील भगवंत बल्ड बँकेने केले.

या रक्तदान शिबिरासाठी हिवरे ग्रामपंचायत, शिवप्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व सर्व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close