-->
आरोग्यकरमाळासामाजिक

वडशिवणे येथे “भारत की आझादी का अमृत महोत्सव” उपक्रमांतर्गत कोरोना लसीकरण शिबिर

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील मौजे वडशिवणे येथे चालू वर्षी भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यामुळे केंद्र सरकार “भारत की आझादी का अमृत महोत्सव ” हा उपक्रम संपूर्ण देशात राबवत आहे. त्या अनुषंगाने भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालयामार्फत गावात काम करत असलेल्या नेहरू युवा मंडळ वडशिवणे, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आजीविका मिशन अंतर्गत स्थापन केलेल्या आदर्श महिला ग्रामसंघ वडशिवणे, ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र केम यांचे संयुक्त विद्यमाने कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात वडशिवने गावातील एकूण २६४ नागरीकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. यावेळी लसीकरण शिबिराला जिल्हा परिषद सोलापूर चे विद्यमान अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली. याच दरम्यान त्यांनी उमेद अभियानांतर्गत स्थापन केलेल्या आदर्श महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाला भेट दिली व उमेदच्या कार्याचे कौतुक करून उपस्थित महिलांबरोबर संवाद साधत त्यांना बचतीचे व विविध लघुउद्योगाचे धडे दिले. यावेळी त्यांचा ग्रामसंघाच्या अध्यक्षा अनिता राऊत यांनी श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच त्यांना गावात महिलांसाठी अस्मिता भवन उभारणीचा प्रस्ताव देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी ग्रामसंघाच्या अध्यक्षा अनिता राऊत, नेहरू युवा मंडळचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत, वैद्यकीय अधिकारी जगदाळे, आरोग्य सेविका आशा तळेकर, माजी सरपंच रत्नाकर कदम, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण मोरे, ग्रा. पं. सदस्य बाबासाहेब उघडे, उपशिक्षक शहाजी बादल, महादेव भागवत, संतोष देवकर, सोनाली काळे, सुनीता काळे, ईश्वरी टकले, कल्पना केदार, संगीता भगत आदी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close