-->
देशमाहिती विषयकविशेष

आता विना रेशन कार्ड घेता येणार धान्य; संसदेत मोदी सरकारची मोठी घोषणा

 

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

 

मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी मोठी सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार रेशन सुविधा घेण्यासाठी आता रेशन कार्ड सोबत ठेवणं आवश्यक असणार नाही. याबाबत अधिक माहिती देताना अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं की, आता रेशनकार्डधारकांना रेशन ची सुविधा घेण्यासाठी रेशन कार्ड दाखवण्याची गरज नाही.

 

 

पियुष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन कार्ड प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. देशात ‘वन नेशन वन रेशन’ कार्डची सुविधा लागू करण्यात आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार आत्तापर्यंत देशात वन नेशन वन रेशन कार्ड द्वारे ७७ कोटी लोकांना जोडण्यात आलं आहे. यात रेशन कार्ड वापरणाऱ्यांची संख्या ९६.०८ टक्के आहे. तसेच यात ३५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांना सामील करण्यात आलं आहे. एखाद्या व्यक्तीच रेशन कार्ड त्याच्या मूळ राज्यात असेल आणि तो नोकरीनिमित्त दुसर्‍या शहरात आपल्या कुटुंबासह राहत असेल तर त्याला त्याचा रेशन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड ची माहिती देऊन कोणत्याही दुकानातून रेशन धान्य मिळू शकत. यासाठी मूळ रेशन कार्ड दाखवण्याची गरज नाही. केंद्र सरकारने आत्तापर्यंत राज्य सरकारांना वन नेशन वन रेशन साठी कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.

 

 

आत्तापर्यंत रेशन धान्य दुकानात धान्य घेताना शिधापत्रिकाधारकांना रेशन कार्ड द्यावा लागत होतं. परंतु आता रेशन कार्ड होल्डर जिथे राहतात तिथे जवळच्या रेशन धान्य दुकानात रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबर सांगावा लागेल. त्यानंतर त्यांना सहजपणे धान्य मिळेल.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close