-->
क्राईमराज्य

रंगाचा बेरंग! होळीचा उत्साह बेतला जीवावर; फुगा मारल्याने एकाचा अपघातात मृत्यू

 

माय मराठी न्युज नेटवर्क

 

 

होळी आणि धुळवडीचा सर्वत्र आनंद साजरा केला जात असतानाच रंगाचा बेरंग करणारं वृत्त समोर आलं आहे. विरार पश्चिमेकडील आगाशी येथे बाईकस्वाराला फुगा लागल्याने दुचाकी आणि सायकलचा अपघात झाला आहे. या अपघातात सायकलस्वार जागीच ठार झाला असून या प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी संबंधित बाईकस्वाराला ताब्यात घेतले आहे. फुगे मारण्यावर बंदी असतानाही होळीच्या दिवशी अनेकजण रस्त्यावर जाणाऱ्यांना फुगे मारून आपला आनंद साजरा करत असतात. पण त्यामुळे अनेकांना अशा दुर्घटनेचे बळी व्हावे लागत आहे. अशीच एका घटना गुरुवारी विरार येथील आगाशी चाळपेठ परिसरात घडली आहे.

 

 

बूटपॉलिशचे दुकान बंद करून होळीचा सण साजरा करण्यासाठी घरी निघालेल्या रामचंद्र हरिनाथ पटेल यांना आपला जीव गमवावा लागला आहे. रामचंद्र सांयकाळी पाच वाजताच्या सुमारास विरारवरून चाळपेठच्या दिशेने जात असताना, शेजारून होळी आणण्यासाठी गेलेल्या एका गाडीतून काही मुले फुगे मारत होते. यातील एक फुगा अर्नाळा ते विरारच्या दिशेने बाईकवरुन येणाऱ्या मुलांना लागला. अचानक फुगा लागल्याने त्यांचा ताबा सुटला आणि सायकलवरील रामचंद्र यांना जावून ते धडकले. यात रामचंद्र यांचा जागीच मृत्यू झाला.

 

 

सदर घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रामचंद्र यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि दोन बाईकस्वारांनाही चौकशी साठी ताब्यात घेतले. सदरचे बाईकस्वार हे अर्नाळा गावातील तरुण आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close