-->
करमाळाक्राईम

जातेगाव–टेंभुर्णी मार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

अहिल्यानगर–टेंभुर्णी महामार्गावरील मांगी गावाच्या हद्दीत कामोने फाट्यानजीक आज बुधवार दि. २२ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास दुचाकीचा व अज्ञात वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी वाहनाला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील जेऊर येथील अजिंक्य मंगवडे हे त्यांच्या युनिकॉर्न (एमएच ४५ एसी ४३८७) या दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. अपघातानंतर धडक देणाऱ्या अज्ञात वाहनासह चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

 

या भीषण अपघातात अजिंक्य मंगवडे यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मयतास पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close