-->
करमाळाकृषी विषयक

दहिगाव योजनेचे थकित वीज बिल कृष्णा खोरे महामंडळाने भरले-आ. संजयमामा शिंदे यांची माहिती

 

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी व उन्हाळी आवर्तन तब्बल ११२ दिवस चालले होते. या आवर्तनाचे १ कोटी २ लाख वीज बिल आलेले होते. त्यापैकी यापूर्वीच ४६ लाख रुपये वीज बिल पाटबंधारे विभागाने भरलेले होते .थकित राहिलेले ५६ लाख ४ हजार रुपये वीज बिल कृष्णा खोरे महामंडळाने नुकतेच भरले असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, आपण आमदार झाल्यापासून अद्याप एक रुपयाही पाणीपट्टीच्या नावाखाली लोकांकडून गोळा केलेला नाही. शासन दरबारी पाठपुरावा करून आपण कृष्णा खोरे महामंडळाला विज बिल भरण्यास भाग पाडले आहे. आत्तापर्यंत एकूण २ कोटी ५० लाख रुपये वीज बिल दहिगाव योजनेचे भरलेले आहे. सध्या महावितरणकडून विज बिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू असली तरी दहिगाव योजनेचे वीजबिल भरल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही असेही ते म्हणाले.

दहिगाव उपसा सिंचन योजनेबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे आणि लोकांना बारमाही पिके घेण्याकडे वळवणे हे आपले उद्दिष्ट असून ज्या वेळेस लोकांच्या हातामध्ये पैसे येतील त्यावेळेस ते आपोआपच पाणीपट्टी भरतील असा मला विश्वास आहे. दुसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमधून उर्वरीत कामे वेगाने पूर्ण करणे आणि १० हजार ५०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणणे हे आपले धोरण आहे असेही ते यावेळी म्हणाले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close