-->
करमाळा

श्रावण मासा निमित्त तिसऱ्या सोमवारी ‘शिवलिंगाची’ पेढ्या ने सजावट

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत देवस्थान श्री ऊत्तरेश्वर देवस्थान च्या शिवलिंगाची सजावट व पुजा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या प्रकारची असते. आज दिनांक २३/०८/२०२१ रोजी तिसऱ्या सोमवारी शिवलिंगाची सजावट पेढयाने केली होती.

या पुजेसाठी ऊत्तरेश्वर चे भाविक योगेश शेट वासकर यांनी आर्थिक मदत केली आहे. या पुजेसाठी सव्वा सात किलो पेढा लागला असुन त्या पेढ्याने शिवलिंगाची सजावट पुजारी गणेश गुरव, भैया गुरव, बाळू गुरव, यांनी केली.

यासाठी कुंडलिक तळेकर, शुभम साखरे यांनी परिश्रम घेतले. आज भाविकांनी कोरोनाचे नियम पाळून श्रीचे दर्शन घेतले. ही सजावट पाहून भाविक सजावट करणाऱ्यांचे कौतुक करत होते. ऊत्तरेश्वर देवस्थान चे चेअरमन दादासाहेब गोडसे यांनीही यावेळी पुजाऱ्याने कौतुक केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close