अतुल खूपसेंच्या रास्ता रोकोनंतर महावितरण ला जाग; शेतीपंपाचा वीजपुरवठा केला पूर्ववत
अतुल खुपसे पाटलांनी रास्ता रोको केल्यानंतर करमाळयातील शेतीपंपाची विज सुरळीत
करमाळा प्रतिनिधी


करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी रास्ता रोको आंदोलन केले, या रस्ता रोको आंदोलनाला शेकडो शेतकरी उपस्थित होते. तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतातील वीज ८ तासावरून १ तास केली होती. त्यानंतर वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी सामोर येणारे अतुल खूपसे यांच्या लक्षात काही शेतकऱ्यांनी फोन करून ही बाब लक्षात आणून दिली. गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडियावर या आंदोलनाची चर्चा सुरू होती.

२४ ऑगस्ट रोजी दुपारी १२:०० वाजता हे आंदोलन होणार म्हणून सकाळी आठ वाजल्यापासूनच पोलीस बंदोबस्त तैनात केला होताा. वेगवेगळ्या आंदोलनासाठी आणि गणीमी काव्याने आंदोलन करणारे आंदोलक अतुल खुपसे पाटिल हे पोलीसांना चकवा देत आगोदर स्वताची गाडी पुढे पाठवून ते पाठीमागून एका तिनचाकी रिक्षामध्ये येऊन रस्ता रोको आंदोलन चालू केलेे. अहमदनगर – टेंभुर्णी महामार्गावर कुंभेज फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी खूपसे पाटील बोलताना म्हणाले की, भविष्यात कोणत्याही शेतकऱ्याना वीज प्रश्र्नी किंवा इतर कोणतीही समस्या आली तरी माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आज या ठिकाणी शेकडोंच्या संख्येत शेतकरी जमा झाले, त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन. आपल्या एकीमुळे आज आपल्याला न्याय मिळत आहे. तसेच विद्यमान आमदारांनी दोन तास वीज देण्याची घोषणा केली आहे. मात्र, दोन तास वीज आल्यानंतर नदीतून किंवा विहिरीतून शेतात पाणी पोहचायला तेवढा वेळ लागतोय. ८ तास वीज मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचा वीज प्रश्न मार्गी लागेल. आज शेतकऱ्यांच्या एकीचा विजय झाला असे मला वाटते.
पुढेे अधिक बोलताना खूपसे पाटील म्हणाले की, आजी माजी आमदार फक्त निवडणुकीच्या वेळेस मत मागण्यासाठी येतात. मात्र निवडणुका झाल्या की तालुक्याकडे फिरकत नाहीत. मतदान करण्यासाठी लाखोंचा खर्च करतात आणि त्याच्या जीवावर निवडून येतात. आज वीज खंडित झाली कोणताच राजकीय पुढारी समोर आला नाही. मग शेतकरी अशांना का निवडून देतो? असा प्रश्नही आज त्यानी उपस्थित केला. आंदोनाची व्याप्ती पाहून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा आनंदाचे वातावरण पसरलेे.
यावेळी किरण भांगे, ॲड. अजित विघ्ने, राणा महाराज वाघमारे, अविनाश कोडलिगे महाराज, नाना तकीक, हनु यादव, शुभम बंडगर, विजय खुपसे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
विशेष म्हणजे आमदार होण्यासाठी पुढारी पैसे वाटतात पण गरिब शेतकऱ्यांना पैसे नसतील तर त्यांना स्वतः आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले. ज्यांना जमेल तसे वीज बिल भरा. विज खंडीत न करता जमेल तेवढे बिल भरा आणी कोणी महावितरणचा अधिकारी कायदा पायदळी तुडवत असेल तर शेतकऱ्यांच्या मुलांनी कायदा हातात घ्यावा. मी त्याच्या पाठीशी आहे असे आव्हान त्यांनी केलेे.




