-->
राज्यविशेष

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व दुर्गा वाहिनीच्या वतीने अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम साजरा

माय मराठी न्युज

 

दिनांक २२ ऑगस्ट २०२१ रोजी विश्व हिंदू परिषद, छत्रपती संभाजी भाग – बजरंग दल व दुर्गावाहिनी (कोंढवेश्वर प्रखंड उत्तमनगर) च्या वतीने विरालयम गोशाळेत जाऊन गोवंशांना राखी बांधणे असा अनोखा रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

गोशाळेविषयी माहिती सांगताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष

 

कार्यक्रमाचे विशेष म्हणजे साक्षात आदी शक्तीचे प्रतीक असलेल्या दुर्गांच्या हस्ते सदर कार्यक्रम करण्यात आला. सर्व दुर्गा व बजरंगी यांच्या विचारातून अत्यंत स्तुतीतुल्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. तो उपक्रम असा आहे की, हे रक्षाबंधन गौशाळेतील गौवंशांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. गौशाळेतील गोरक्षक, गौसेवक तथा पदाधिकारी यांना ही या वेळी राख्या बांधण्यात आल्या.

आपणांस हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, असा नाविन्यपूर्ण कार्यक्रम गौमातेस तथा गौवंश व गौसेवक, गौरक्षकास समर्पित महाराष्ट्रातील तथा देशातील प्रथमच कार्यक्रम असेल, या नंतर समाजातील अनेक व्यक्ति, संघटना रक्षाबंधनाच्या निमित्ताने गोवंशाना राखी बांधून त्यांच्या रक्षणासाठी वचनबद्ध होतील. असे गौरवोद्गार वीरालयम गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष विनोद राठोड यांनी यावेळी काढले.

 

 

यावेळी विश्व हिंदू परिषद – दुर्गावाहिनी (कोंढवेश्वर प्रखंड उत्तमनगर) च्या कु. अंकिता तोडकर, कु. तमन्ना पांडे, कु. मानसी टेकले, कु. आरती महाडीक, कु. स्नेहा सहानी, कु. प्रतिभा हसारिया, कु. संजना सहानी, कु. सायली पवार, कु. कामिनी राऊत व विश्व हिंदू परिषद – बजरंग दल चे श्री. ऋषिकेश श्रोत्रिय, श्री. राजेश जाधव, श्री.संतोष राजपूत, कु. प्रसाद लोणारे, कु. सुनील मोरे, कु. शिवकुमार पत्रे, कु. अमोल कांबळे, कु. ऋषिकेश पंडित, कु.प्रतीक घोसाले, कु. तुषार नालगुडे, राजवीर श्रोत्रिय हे उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close