माय मराठी न्युज


नागपुर शहरामध्ये १० वर्षे बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेला अफगाणी नागरीक नूर मोहम्मद याचा अफगाणिस्तान मधील शस्त्रासह फोटो प्रचंड व्हायरल होत असल्यामुळे खळबळ उडाली आहे. या अफगाणी नागरिकाला नागपूर पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वीच अफगाणिस्तानला परत पाठविले होते. मात्र, तो नूर मोहम्मद च आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, नूर मोहम्मद हा अफगाणी नागरिक टुरिस्ट व्हीजा वर भारतामध्ये आला होता. मात्र, तो त्याचा व्हीजा संपल्यावरही बेकायदेशीर पणे नागपूरमध्ये रहात होता. याची माहिती नागपूर पोलिसांना दोन महिन्यांपूर्वी समजली तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली होती. मात्र, त्याच्या विरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याने किंवा त्याचा कुठल्याही बेकायदेशीर कृत्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नसल्याने त्याला नागपूर पोलिसांनी परत अफगाणिस्तानला पाठवून दिले होते.
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी केलेल्या कब्जामुळे तेथील फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यातच आता नुर मोहम्मदचा नागपुर आणि अफगाणिस्तान येथील शस्त्रासह असलेला फोटो व्हायरल झाला आहे. मात्र, नागपूर पोलीसांनी व्हायरल होत असलेला फोटो एकाच व्यक्तीचा नसल्याचं सांगितल आहे. आम्ही नूर मोहम्मद या व्यक्तीला दोन महिन्यांपूर्वीच अफगाणिस्तानला परत पाठवले आहे. त्याचे नागपूरमध्ये काही अपराधी कृत्य असल्याचे पुरावे नाहीत. तिथे गेल्यावर तो काय करतोय याच्याशी आमचा काही संबंध नाही. मात्र, त्याचा नागपुर मधील काही लोकांशी संबंध आहेत का हे ही तपासलं जाणार असल्याच पोलिसांनी सांगितलं आहे.




