कृषिदूत जयवंत अंबारे यांच्याकडून गौंडरे येथील शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिके
करमाळा प्रतिनिधी


डॉ . डी . वाय पाटील कृषी महाविद्यालय तळसंदे, कोल्हापूर येथील अंतिम वर्षांत शिकणारा विद्यार्थी जयवंत रामराव अंबारे याने ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम या अभियानांतर्गत गौंडरे ता . करमाळा, जि . सोलापूर येथील शेतकर्यांना बोर्डो मिश्रणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
हवेत जास्त प्रमाणात आद्रता असते ; तेव्हा बुरशीजन्य रोगांचा फळ झाडांवर होणारा प्रादुर्भाव वाढू शकतो.अशा बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बोर्डो मिश्रण अत्यंत उपयुक्त ठरते असे प्रात्यक्षिकावेळी उपस्थित शेतकरी मित्रांना सांगितले.यावेळी शेतकरी ज्ञानेश्वर बिचितकर, रावसाहेब हनपुडे, बापू तांबोळी, आदि . शेतकरी उपस्थित होते.
यासाठी विद्यार्थी जयवंत याला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य.डी .एन .शेलार, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस .एम . घोलपे, प्रा.एस . अार.सूर्यवंशी आणि विषयतज्ज्ञ डॉ. के . एस शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.




