प्रतिनिधी/प्रविण अवचर


मांगी या गावातील रहिवासी, प्रसिद्ध बागायतदार व पुणे येथील उद्योजक श्री. अशोक गहिनिनाथ नरसाळे यांचा मांगी तलावावरील केलविनं कंपनीचा ७-५० एच पी चा शेतीपंप ( किंमत १७०००/- रुपये ) अज्ञात चोरट्यानी काल रात्री दिनांक १८/०८/२०२१ रोजी चोरून नेला आहे. याअगोदर ही शेतीपंपाचे स्टार्टर, केबल, पाईप अशा प्रकारच्या लहान मोठ्या चोऱ्या मांगी व तलाव परिसरात झालेल्या आहेत. परंतु चोरी करणारे चोर सापडत नाही. चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे मांगी व परिसरातील शेतरकऱ्यांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकीकडे दोन महिन्यांपासून पावसाळा सुरू झाला आहे मात्र अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही. करमाळा तालुक्याला दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे शेतातील उभी पिके करपू लागली आहेत. सध्या तलावाच्या पाण्यावरच पिकांना जीवदान मिळत आहे आणि अशातच जर चोरीच्या घटना वाढल्या तर शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे. त्यामुळे अशा चोऱ्यांवर वेळीच बंदोबस्त करायला हवा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
मांगी तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी बंधूनी रात्रीची गस्त एकत्रपणे दिवसाआड आळीपाळीने वाढवायला हवी. त्यामुळे नक्कीच चोरी करणार्यांना लगाम बसेल. तसेच कोणतीही लहान मोठी चोरी झाल्यास रीतसर तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवायला हवी. असे आवाहन मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुजित तात्या बागल यांनी केले आहे.



