-->
क्राईमराज्य

धक्कादायक: ..तिला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू

माय मराठी न्युज नेटवर्क

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यामधील बोरामणी परिसर परिसरात असलेल्या दावल मलिक दर्गा येथे धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या एका महिला व दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. संबंधित तिघेजण एकाच गावातील रहिवासी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

रीहाना तौफिक पिरजादे (वय ३५), यासीन हारुन शेख (वय ३५), मोहम्मद हारून सलीम शेख (वय ४१) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. संबंधीत सर्व जण कुंभारी, नवी विडी घरकुल, तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी असून मृत्तांपैकी दोनजण सख्खे भाऊ आहेत. हे तिघे जण आपल्या कुटुंबीयांसोबत धार्मिक कार्यासाठी बोरामणी येथील दावल मलिक दर्गा येथे गेले होते. दुपारी आपले सर्व धार्मिक कार्य उरकून परत येत असताना तिघेही दर्गा परिसरातील वन विभागाच्या क्षेत्रात तलावाजवळ गेले. यावेळी रिहाना पाण्यात उतरली पण पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडाली. गावातील एक महिला पाण्यात बुडत असल्याचे दोघा भावंडांना दिसले. यावेळी दोघेही पाण्यात उतरले व पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.

 

तलावाजवळ असलेल्या इतर ग्रामस्थांनी तिघांनाही पाण्याबाहेर काढले असता ते तिघेही बेशुद्धावस्थेत होते. याबाबत दक्षिण सोलापूर तालुका पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण घुगे आणि त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन दाखल पंचनामा केला. तिघांनाही उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच या तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर घटनेची दक्षिण सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close